AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीच्या अतिरिक्त टायरला स्टेपनी का म्हणतात? कुठून आलं हे नाव?

वाहनांमध्ये अतिरिक्त टायर ठेवला जातो आणि तो लगेच बदलला जातो. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत टायर पंक्चर झाल्यास तो वेळ वाया जाणार नाही. या अतिरिक्त टायरला स्टेपनी म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का या अतिरिक्त टायरला स्टेपनी का म्हणतात? त्यामागे एक रंजक कथा आहे.

गाडीच्या अतिरिक्त टायरला स्टेपनी का म्हणतात? कुठून आलं हे नाव?
stepney
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 25, 2023 | 10:09 AM
Share

मुंबई: आजच्या काळात वाहने पंक्चर झाली की पंक्चर दुरुस्त करण्यासाठी लगेच दुकान शोधण्याची गरज भासत नाही. त्याऐवजी वाहनांमध्ये अतिरिक्त टायर ठेवला जातो आणि तो लगेच बदलला जातो. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत टायर पंक्चर झाल्यास तो वेळ वाया जाणार नाही. या अतिरिक्त टायरला स्टेपनी म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का या अतिरिक्त टायरला स्टेपनी का म्हणतात? त्यामागे एक रंजक कथा आहे.

खरं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 100 वर्षांपूर्वी वाहनांचा इतका ट्रेंड नव्हता. ब्रिटनच्या रस्त्यांवर वाहनांचे टायर खराब व्हायचे तेव्हा लोकांना खूप संघर्ष करावा लागत. त्यांना रस्त्यावर दुकान शोधावे लागत आणि मग पंक्चर झालेले टायर बदलावे लागत. या समस्या लक्षात घेऊन इंग्लंडमधील दोन भावांनी टायर बदलण्याचे दुकान उघडले.

दोन्ही भावांनी दुकानाचे नाव स्टेपनी टायर सर्व्हिस असे ठेवले. खरं तर स्टेपनी हे नाव दोन्ही भावांच्या जिल्ह्याचे नाव होते आणि त्यांनी जिल्ह्याच्या नावाने एक दुकान उघडले होते. वॉल्टर आणि टॉम डेव्हिस अशी या दोन भावांची नावे होती. यानंतर हळूहळू त्याचा व्यवसाय वाढत गेला आणि ते दुकान स्टेपनी या नावाने प्रसिद्ध झाले. लोक अतिरिक्त टायरला स्टेपनी या नावाने ओळखू लागले, हाक मारू लागले.

आता शंभर वर्षांनंतर लोक त्याच एक्स्ट्रा टायरला स्टेपनी म्हणतायत. कोणत्याही आपत्कालीन वेळी ते कामी यावे यासाठी खबरदारी म्हणून वाहनांमध्ये ठेवलेली ही अतिरिक्त गोष्ट आहे. आता अशा अनेक मोठ्या गाड्या आहेत ज्यात एक नव्हे तर अनेक अतिरिक्त टायर ठेवलेले असतात. यामध्ये मोठे ट्रक आणि इतर मालगाड्यांचा समावेश आहे.

Follow Us
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...