AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी 21 जून हा दिवस का निवडला गेला? जाणून घ्या त्या दिवसाचे महत्त्व

जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी 11 वा योग दिन साजरा केला जात आहे. पण यासाठी 21 जून हा दिवस का निवडला गेला आहे, हा दिवस एवढा खास काय आहे? तसेच त्या दिवसाचे महत्व काय आहे? चला जाणून घेऊया त्याबद्दल

आंतरराष्ट्रीय  योग दिनासाठी 21 जून हा दिवस का निवडला गेला?  जाणून घ्या त्या दिवसाचे महत्त्व
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 7:35 PM
Share

आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा आणि योग, योगासने त्याचबरोबर योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून योगाचे महत्त्व त्याचे फायदे आणि योगासनाची गरज पटवून दिलेली आहे. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदरूस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करतात येतात. त्यात योगा करणे म्हणजे एकत्र येणे होय. तर या योगा दिनाची सर्वात प्रथम सुरूवात ही आपल्या भारतात झाली, जो आजच्या घडीला आज संपूर्ण जग साजरा करत आहे. जागतिक स्तरावर या महान वारशाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने, दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. पण दरवर्षी 21 जूनलाच हा दिवस का साजरा केला जातो? या दिवसाची सुरूवात कशी झाली ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरूवात

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर त्यांच्या या प्रस्तावाला 177 देशांचा पाठिंबा मिळाला. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. पण यासाठी २१ जून ही तारीख का निवडण्यात आली? चला जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून 21 जूनच का?

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील एक कारण म्हणजे 21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. तर दुसरीकडे, भगवान शिव, ज्यांना आदियोगी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी या दिवसापासूनच आपल्या शिष्यांना योगाचे ज्ञान देण्यास सुरुवात केली.

योग दिनाचे उद्दिष्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेक लोक शारीरिक आणि मानसिक ताणतणावाशी झुंजत आहेत, अशा परिस्थितीत योग करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे अनेक प्रकारचे आजार रोखता येतात, शरीर सक्रिय राहते आणि ताण कमी होतो. भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, ज्यामध्ये पंतप्रधान स्वतः सहभागी होतात.

भारतात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, दरवर्षी या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये, उद्याने आणि सामुदायिक ठिकाणी योग शिबिरे, कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. लाखो लोक एकत्र योगासने करून जागतिक विक्रम देखील करतात.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 थीम

दरवर्षी योग दिन एका थीमसह साजरा केला जातो. या वर्षीची थीम “एक पृथ्वी, एक आरोग्य” आहे. या थीमच्या माध्यमातून निसर्गाचा आदर करावा. कारण आपले आरोग्य हे पृथ्वी ग्रहाच्या आरोग्याशी जोडलेले आहे. त्यामुळे जर आपण आपल्या ग्रहाचे रक्षण केले नाही तर आपण निरोगी राहू शकत नाही. कारण पृथ्वी वर असलेली हवा, पाणी तसेच आपण खातो ते अन्न या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याची आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.