आयब्रो कलर करायला पार्लरमध्ये गेली, पण ब्युटिशिअनने घातला घोळ; महिलेचा डोळाच कामातून गेला असता..

आजकाल बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात, ते खूप कॉमन आहे. कधी पार्टी, तर कधी लग्न किंवा अगदी रेग्युलर कामांसाठीसुद्धा महिला ब्युटी पार्लरमध्ये जातत असतात. तेथे जाऊन मेकअपही करून घेतात. साधरणत: मेकअपमुळे कोणाला फारसा त्रास होत नाही, ना महिलांचा चेहरा खराब होतो. पण काही वेळा महिलांना एखाद्या क्रीमची ॲलर्जी होऊन त्यांच्या चेहऱ्याची स्थिती बिघडते.

आयब्रो कलर करायला पार्लरमध्ये गेली, पण ब्युटिशिअनने घातला घोळ; महिलेचा डोळाच कामातून गेला असता..
ब्युटिशिअनने घातला असा घोळ; महिलेचा डोळाच कामातून गेला असता
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 2:03 PM

आजकाल बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात, ते खूप कॉमन आहे. कधी पार्टी, तर कधी लग्न किंवा अगदी रेग्युलर कामांसाठीसुद्धा महिला ब्युटी पार्लरमध्ये जातत असतात. तेथे जाऊन मेकअपही करून घेतात. साधरणत: मेकअपमुळे कोणाला फारसा त्रास होत नाही, ना महिलांचा चेहरा खराब होतो. पण काही वेळा महिलांना एखाद्या क्रीमची ॲलर्जी होऊन त्यांच्या चेहऱ्याची स्थिती बिघडते. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. तिच्या भुवया अर्थात आयब्रोज रंगवण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली होती, पण तिच्या ब्युटीशियनने एक चूक केली, ज्यामुळे ती महिला जवळजवळ आंधळी झाली.

डॅनिअल हबर्ड असे या महिलेचे नाव आहे. ती पार्लरमध्ये गेल्यावर तिची ब्युटिशिन तिच्यावर पॅच टेस्ट/ ॲलर्जी टेस्ट करायला विसरली आणि तिने तशाच आयब्रो कलर केल्या. मात्र त्यामुळे डॅनिअल हिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. मिररच्या रिपोर्टनुसार, डॅनिअलने माल्टामध्ये तिच्या सुट्टीपूर्वी 12 पौंड म्हणजेच सुमारे 1237 रुपये किमतीची ब्युटी ट्रीटमेंट बुक केली होती. पण तिच्या म्हणण्यानुसार, तिला ब्युटीशियनने पॅच टेस्टची ऑफर दिली नव्हती. ती ब्युटी ट्रीटमेंट सुरू केल्यावर सुरूवातील तर तिचा चेहरा अगदी नीट होता, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने उठून आरशात पाहिलं तर तिचा डावा डोळा खूप सुजला होता. एवढंच नव्हे तर तिचा चेहराही प्रचंड लाल झाला होता आणि सूज आली होती.

चेहरा झाला भयानक

डॅनिअलच्या सांगण्यानुसार, दुसऱ्या दिवशी ती डोळ्याने नीट पाहू शकत नव्हती. आरशात स्वत:चा चेहरा पाहून तर ती खूपच घाबरली. तिच्या भुवया खूप कडक झाल्या आणि त्यावर बरेच खवले आले होते. आणि संपूर्ण चेहरा सुजला होता. त्यानंतर तिने तातडीने ॲलर्जीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. तिथे तिला स्टेरॉईड्स देण्यात आले, तेव्हा कुठे थोड्या वेळाने तिचा चेहरा बरा झाला. यानंतर, ती पुन्हा ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि तक्रार केली तसेच नुकसान भरपाई देखील मागितली. मात्र त्या ब्युटिशिअनला तिच्या चुकीची जराही जाणीव नव्हती, माफी मागणं तर दूरच राहिलं.

असा शिकली धडा

रिपोर्ट्सनुसार, त्या संबंधित ब्युटी पार्लरवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी डॅनिअलने एका वकिलाशीही संपर्क साधला. पण त्या पार्लरचा कोणताही विमा काढलेला नाही, त्यामुळे तक्रार करण्यात काही अर्थ नाही, असे तिला वकिलाने सांगितलं. ‘मी यापूर्वी कधीही माझ्या भुवया कलर केल्या नव्हत्या. त्या घटनेनंतर मी परत कधीच त्या पार्लरमध्ये गेले नाही आणि आता कधीच माझ्या भुवया पुन्हा रंगवणार नाही,’ असं डॅनिअलने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.