Video | फळे विकल्यानंतर महिलेने बस स्थानक स्वच्छ केले, आनंद महिंद्रा म्हणाले…

Amazing Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कर्नाटक राज्यातील असून त्यामुळे त्या व्हिडीओने अनेकांचं मनं जिंकलं आहे. एका फळ विक्रेत्या महिलेचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे.

Video | फळे विकल्यानंतर महिलेने बस स्थानक स्वच्छ केले, आनंद महिंद्रा म्हणाले...
Amazing Viral Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 9:11 AM

मुंबई : कर्नाटक (Karnataka) राज्यातील एका आदिवासी महिलेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती महिला बस स्टँडची साफसफाई करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या महिलेने असं का केलं असावं हे जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra), उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष यांना अधिक आवडला असून त्यांनी तो व्हिडीओ (Amazing Viral Video) शेअर केला आहे. त्यावर आत्तापर्यंत अनेक कमेंट देखील आल्या आहेत.

सगळेजण कधी ना कधी बसने नक्की प्रवास करतात, आपण ज्यावेळी बस स्टँडवरती उभे असतो. त्यावेळी अनेकजण तिथं पाण्याची बॉटल आणि चिप्स विकत असल्याचे पाहायला मिळते. काहीवेळेला प्रवासी तिथं घेतलेलं खाण्याच्या पदार्थावरती प्लास्टिक तिथचं काढून टाकतात किंवा बिस्लेरी बॉटल फेकून देतात. त्यामुळे इतर नागरिकांना त्यांचा अधिक त्रास होतो.

महिला बसच्या स्टॅडची साफसफाई करीत आहे

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कर्नाटक राज्यातील आहे. अंकोला बस स्टॅडवर एक महिला फळ विकण्याचं काम करीत आहे. ती महिला पानात बांधलेली फळे विकते. ज्यावेळी लोकं प्रवासात फळं खातात त्यावेळी ती पान तिथचं फेकून देतात असं अनेकदा दिसून आलं आहे. त्यानंतर ती महिला सगळा कचरा उचलून तिथल्या कचरा कुंडीत टाकत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आदर्श हेगडे यांनी शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा प्रभावित झाले

हा व्हिडीओ पाहिल्यापासून आनंद महिंद्रा अधिक प्रभावित झाले आहेत. त्यांनी तो व्हिडीओ रीट्वीट केला आहे. त्यावर ‘हेच खरे हिरो आहेत ज्यांनी भारताला स्वच्छ केले.’ यासोबतच त्यांनी महिलेचे खूप कौतुकही केले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाख 92 हजार लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी महिलेचे कौतुक करत आहेत आणि तिला समाजासाठी आदर्श मानत आहेत.