AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | नापास झालेला मुलगा लोकांच्या प्रश्नामुळे त्रस्त, नंतर पाठीवर लावलं पोस्टर अन् केली घोषणा

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा पाठीवर पोस्टर लावून फिरत आहे. त्या पोस्टरवरती मुलाने चांगला मेसेज लिहिला आहे, त्यामुळे तो व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.

VIDEO | नापास झालेला मुलगा लोकांच्या प्रश्नामुळे त्रस्त, नंतर पाठीवर लावलं पोस्टर अन् केली घोषणा
student viral videoImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 7:54 AM
Share

मुंबई : विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे निकाल (Annual Examination Results) जाहीर करण्यास शाळांनी सुरुवात केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात शाळा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करते. त्यामध्ये पास झालेले विद्यार्थी अधिक खूश असतात. त्याबरोबर पुढच्या वर्गात जाणार असल्याची खुशी त्याच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत असते. तर काही विद्यार्थ्यांना मार्क कमी मिळाल्याने त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आपल्या देशात विद्यार्थ्यांच्या (Result Viral Video) शेजाऱ्यांना अधिक विद्यार्थ्यांची काळजी असते असं दिसून आलं आहे. कारण ते विद्यार्थ्यांच्या निकालाची (Viral Video) अधिक आतुरतेने वाट पाहत असतात.

सध्या काही विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे दिसत आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांचे चेहरे निराश दिसत आहेत. सध्या एका विद्यार्थ्याने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो विद्यार्थी परीक्षेत फेल झाला आहे. त्याला पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही अशी स्थिती आहे. त्याच्या मागे तो नापास झाल्याचं कारण आहे, त्यामुळे त्याने एक नवी कृती केली आहे. त्याची सगळी चर्चा सुरु आहे.

पाठीवर लावलेला पोस्टर होतोय व्हायरल

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती mokush555 या नावाच्या प्रोफाईलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी रस्त्यावरील असलेल्या स्टॉलवरती छोले- भटूरे खात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या पाठीवर एक कागद लावला आहे. त्यावरती ‘मी नापास झालो आहे. वारंवार निकाल विचारून जखमेवर मीठ चोळू नका.’

View this post on Instagram

A post shared by Mokush555 (@mokush555)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर 17 मिलियन लोकांनी…

एका नापास झालेल्या विद्यार्थ्यांला काय लागत आहे असा प्रश्न अनेकांनी केला आहे. काही पालकांनी याबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे. ज्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर हा पोस्टर अजून कितीजण लावणार असा प्रश्न केला आहे. 17 मिलियन लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना हसू आवरत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिले की, भावाने मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. दुसर्‍याने लिहिले, ‘लोक अजूनही विचारतील, भाऊ कसे अयशस्वी झाले.’

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.