GF BF Video : पाच वर्षांनी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड भेटले, विमानतळावर समोर येताच तरूणीने असं काही केलं की तो लाजला, व्हिडीओ व्हायरल

ज्यामध्ये एका तरूणीला तिचा बॉयफ्रेंड पाच वर्षांनंतर भेटायला येतो म्हणून ती त्याला खास सरप्राइज देताना दिसत आहे. तिनं दिलेलं सरप्राईज पाहून तिचा बॉयफ्रेंड चक्क लाजला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

GF BF Video : पाच वर्षांनी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड भेटले, विमानतळावर समोर येताच तरूणीने असं काही केलं की तो लाजला, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Nov 11, 2023 | 12:09 PM

मुंबई : प्रेमात लोकं काहीही करायला तयार असतात, कारण प्रेमात माणूस पूर्णपणे आंधळा होत असतो. त्यात प्रेमासाठी कायपण असं म्हटलं जातं. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. मग काही लोक तर जीव देखील देतात तर काही लोक आपल्या प्रिय व्यक्तीला खूश करण्यासाठी त्याच्या आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. आजकालचे तरूण-तरूणी तर त्यांच्या प्रिय व्यक्तीला वेगवेगळे सरप्राइज देताना दिसतात. तर आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरूणीनं तिच्या प्रियकराच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर असं काही केलं आहे की तुम्ही याचा स्वप्नातही विचार केला नसेल. या तरूणीचा बॉयफ्रेंड जेव्हा एअरपोर्टच्या गेटमधून बाहेर येत असतो तेव्हा त्याच्या हातात काही लोक गुलाबाची फुलं देतात. हे पाहून तो थोडा सरप्राइज होतो.

पुढे तो चालत येतो तेव्हा त्याच्यासमोर त्याची गर्लफ्रेंड डान्स करताना दिसते. ही तरूणी तिचं तिच्या बॉयफ्रेंडवर किती प्रेम आहे हे तिच्या डान्समधून त्याला दाखवते. डान्स पाहून तिचा बॉयफ्रेंड लाजतो आणि भावनिक होताना दिसतो. त्यानंतर तो भावनिक होत तिला मिठी मारतो. सध्या हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

दरम्यान, जेव्हा ही तरूणी एअरपोर्टवर सार्वजनिक ठिकाणी डान्स करत होती तेव्हा तेथील सर्व प्रवासी तिच्याकडे चकीत होऊन पाहत होते. पण हाच डान्स या तरूणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जवळ आणतो. तसंच हा खास क्षण सर्व प्रवासी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतात. तर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हि़डीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.