वर्षाला 4 अब्ज 64 कोटींची कमाई! कोण आहे हा YouTuber? पाहा तुम्ही पण कसे बनू शकतात YouTube Star!
YouTube म्हणजे तुमच्यासाठी फक्त टाइमपास व्हिडीओ बघायची जागा, असं तुम्हालाही वाटय का? मग जरा थांबा आणि MrBeast नावाच्या YouTuber ची कमाई ऐका... वर्षाला तब्बल ४६४ कोटी रुपये! होय, ही चेष्टा नाही! हा आकडा दाखवून देतो की YouTube आता मनोरंजनासोबतच कमाईचा किती मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. फक्त परदेशातच नाही, तर आपले भारतीय YouTuber जसे की Technical Guruji आणि CarryMinati पण करोडोंची कमाई करत आहेत. कसं करतात हे लोक एवढी कमाई? आणि तुम्हीही कसे बनू शकतात YouTube Star? चला जाणून घेऊया!

‘यूट्यूब’ हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात व्हिडिओज, गाणी, गेमिंग, ट्रेंडिंग कंटेंट आणि मनोरंजनाचा अखंड खजिना! पण, हा केवळ वेळ घालवण्याचा प्लॅटफॉर्म नसून, योग्य कल्पना आणि मेहनतीच्या जोरावर करोडोंची कमाई करण्याचं हे एक जबरदस्त व्यासपीठ आहे.
अमेरिकेचा ‘MrBeast’ अर्थात जिमी डोनाल्डसन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अवघ्या काही वर्षांत MrBeast ने यूट्यूबवरून जबरदस्त आर्थिक यश मिळवलं. फोर्ब्स आणि सेलिब्रिटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार, २०२५ च्या सुरुवातीपर्यंत MrBeast ने तब्बल ५४ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ४ अब्ज ६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे!
MrBeast याच्या यूट्यूब व्हिडिओंमध्ये अफाट चॅलेंजेस, अनोखे सामाजिक प्रयोग आणि कोट्यवधींच्या वस्तू किंवा रोख स्वरूपातील देणग्या हे त्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे. फक्त परदेशातच नाही, तर भारतातसुद्धा अनेक यशस्वी यूट्यूबर्स आहेत. त्यात गौरव चौधरी (Technical Guruji) याचं नाव अग्रस्थानी येतं. टेक्नॉलॉजी विषयातील जटिल गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगणारा गौरव याची संपत्ती सुमारे ३७६ कोटी रुपयांच्या आसपास आहे.
तर दुसऱ्या बाजूला, अजय नागर ऊर्फ ‘CarryMinati’ भारतातील सर्वात लोकप्रिय यूट्यूबर्सपैकी एक आहे. त्याचे रोस्टिंग, गेमिंग आणि विनोदी व्हिडिओ प्रचंड गाजले आहेत. त्यामुळे त्यानेही करोडोंची कमाई केली आहे.
यूट्यूब आता केवळ व्हिडिओ पाहण्याचं माध्यम राहिलेलं नाही, तर कमाईचं एक मोठं व्यासपीठ बनलं आहे. मात्र यश मिळवण्यासाठी कल्पकता, सातत्य, दर्जा आणि संयम यांचीच खरी गरज आहे.
MrBeast सारख्या यशस्वी यूट्यूबर्सनी हेच सिद्ध केलंय, की कल्पना मोठी असेल तर यूट्यूबवर कमाईचं स्वप्न खरं होऊ शकतं!
