Salary : दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना बंपर भेट, डीए वाढीने पगारात एवढी होणार वाढ

| Updated on: Sep 28, 2022 | 4:30 PM

Salary : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिवाळीचे बंपर गिफ्ट दिले..त्याचा असा फायदा होणार आहे..

Salary : दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना बंपर भेट, डीए वाढीने पगारात एवढी होणार वाढ
पगारात होईल अशी वाढ
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : महागाईशी (Inflation) दोन हात करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना बंपर गिफ्ट दिले. 4 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowances) मंजूर केला. अनेक दिवसांपासून कर्मचारी महागाई भत्याची प्रतिक्षा करत होते. त्यांना पगारात त्याचा कसा फायदा होईल ते पाहुयात..

आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. पूर्वी हा भत्ता 34 टक्के इतका होता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडलेला आहे. त्याआधारे महागाई भत्ता ठरवण्यात येतो. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील निर्देशांकानुसार महागाई भत्ता ठरविण्यात आला. DA देण्याच्या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि 62 लाख निवृत्तांना लाभ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार वा पेन्शन 25000 रुपये असेल तर त्याला 38 टक्के डीएच्या हिशोबाने 9500 रुपये मिळतील. यापूर्वी 34 टक्के डीए मिळत होता. त्यावेळी 8500 रुपये महागाई भत्ता मिळाला होता. आता त्यात दर महिन्याला 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

कर्मचाऱ्याचे मुळ वेतन 35,000 रुपये असेल तर त्याला 38 टक्के डीएच्या हिशोबाने 13,300 रुपये मिळतील. यापूर्वीच्या 34 टक्क्यांप्रमाणे त्याला 11900 रुपये मिळत होते. डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्याने कर्मचाऱ्याला दर महिन्याला 1400 रुपयांचा फायदा होईल

कर्मचाऱ्याचे मुळ वेतन 45,000 रुपये असेल तर त्यांना या नवीन 38 टक्के महागाई भत्त्याप्रमाणे 17,100 रुपये मिळतील. तर 34 टक्के महागाई भत्त्याप्रमाणे 15300 रुपये मिळत होते. आता या बदलामुळे त्यांना दर महिन्याला 1800 रुपये जास्त मिळतील.

तर 55000 रुपये मुळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. 38 टक्के डीए प्रमाणे त्यांना 20900 रुपये मिळतील. 34 टक्के डीएप्रमाणे त्यांना 18,700 रुपये मिळत होते. आता त्यांना दर महिन्याला 2200 रुपये अधिक मिळतील.