कमी बजेट आहे का? मग या बाईक्स फक्त तुमच्यासाठी, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

1.50 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सबद्दल आम्ही आज माहिती देणार आहोत. या बजेट रेंजमध्ये अनेक बाईक्स आहेत, पण आज आम्ही तुमच्यासाठी या प्राइस सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय आणि पॉवरफुल बाईक्स घेऊन आलो आहोत.

कमी बजेट आहे का? मग या बाईक्स फक्त तुमच्यासाठी, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
| Edited By: | Updated on: Feb 19, 2025 | 7:01 PM

Bikes Under 1.50 lakh : बाईक घेण्यासाठी बजेट कमी आहे का? मग चिंता करू नका. आम्ही आज तुम्हाला तुमच्या बजेटवाली बाईक दाखवणार आहोत. तुम्ही 1.50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. याविषयी पुढे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आजकाल बाजारात बाइक्सचे अनेक पॉवरफुल ऑप्शन उपलब्ध आहेत, त्यापैकी तुम्ही तुमचा आवडता पर्याय निवडू शकता. या बजेट रेंजमध्ये अनेक बाईक्स आहेत, पण आज आम्ही तुमच्यासाठी या प्राइस सेगमेंटमधील सर्वात पॉप्युलर आणि पॉवरफुल बाईक्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही 1.50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

दीड लाखांमधील बाईक्स कोणत्या आहेत?

रॉयल एनफिल्ड हंटर 350, टीव्हीएस अपाचे आरटीआर 160, बजाज पल्सर एनएस 200, होंडा एसपी 125 आणि टीव्हीएस रेडर 125, या बाईक्सबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्या तुम्ही 1.50 लाख रुपये बजेट ठेवल्यास तुम्हाला या बाईक्स घेता येतील. विशेष म्हणजे तरुणांमध्ये या बाईक्स लोकप्रिय आहे. तुम्ही 1.50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. याविषयी पुढे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रॉयल एनफिल्ड हंटर 350 : या बाईकची सुरुवातीची किंमत 1.50 लाख रुपये आहे. ही एक आकर्षक आणि दमदार बाईक आहे, जी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

टीव्हीएस अपाचे आरटीआर 160: या बाईकची सुरुवातीची किंमत 1.17 लाख रुपये आहे. ही स्पोर्टी दिसणारी बाईक आहे, जी चांगल्या फीचर्ससह येते.

बजाज पल्सर एनएस 200 : या बाईकची सुरुवातीची किंमत 1.42 लाख रुपये आहे. ही एक दमदार इंजिन बाईक आहे, जी रायडिंग शौकिनांना आवडेल.
होंडा एसपी 125 : या बाईकची सुरुवातीची किंमत 90 हजार रुपये आहे. ही किफायतशीर आणि मायलेज देणारी बाईक आहे, जी रोजच्या वापरासाठी उत्तम आहे.

टीव्हीएस रेडर 125 : या बाईकची सुरुवातीची किंमत 89 हजार रुपये आहे. ही एक स्टायलिश आणि यंग लुकिंग बाईक आहे, जी चांगल्या फीचर्ससह येते.

या सर्व बाईक्स 1.50 लाखांच्या बजेटमध्ये उपलब्ध असून आपापल्या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम पर्याय आहेत. यापैकी कोणतीही बाईक तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार निवडू शकता. शेवटचा निर्णय तुमचा असेल.