Best Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल, वर्षभरात 184 टक्क्यांची वाढ

| Updated on: Mar 28, 2022 | 8:42 PM

गेल्या काही दिवसांपासून शुगर स्टॉकस (Sugar stocks) फोकसमध्ये आहेत. साखर (Sugar) क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Best Multibagger Stock : या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल, वर्षभरात 184 टक्क्यांची वाढ
शेअर बाजार
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून शुगर स्टॉकस (Sugar stocks) फोकसमध्ये आहेत. साखर (Sugar) क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. देशातील काही निवडक साखर कंपन्यांमध्ये समावेश असलेली धामपुर शुगर मिल्स लिमिटेडचा (Dhampur Sugar Mills Limited) देखील यामध्ये समावेश आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअरचे भाव 185 रुपयांनी वाढून 525 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 184 टक्क्यांची वाढ झाली आहे. केवळ चालू वर्षातच नाही तर मागील दहा वर्षात धामपुर शुगर मिल्स आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देत आलीये.

गुंतवणूकदारांना किती परतावा मिळाला?

जर एका वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने धामपुर शुगर मिल्स लिमिटेडच्या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक केली असेल तर आज त्या एक लाखांचे मुल्य वाढून ते 2.84 लाख रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे एखाद्या व्यक्तीने जर या कंपनीच्या शेअरमध्ये पाच लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची गुंतवणूक जवळपास अडीच पट म्हणजे 14.2 लाखांवर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांना या शेअरमधून चांगला परतावा मिळत असल्याने शेअरची मागणी देखील वाढली आहे.

नव्या इथेनॉल धोरणाचा फायदा

सरकार लवकरच आपले नवे इथेनॉल धोरण जाहीर करणार आहे. नव्या इथेनॉल धोरणामुळे साखर कंपन्यांचा नफा वाढू शकतो. त्यामुळे कंपन्यांच्या शेअरमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. धामपुर शुगर मिल्स लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात मालामाल केले असून, कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 184 टक्क्यांची वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

गुंतवणूक करायचीये? तर ‘ही’ बँक देतीये बचत खात्यावर सर्वाधिक व्याजदर, आजच खाते ओपन करा

Aditya Thackarey : सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

IPL 2022: Sachin Tendulkar च्या मदतीमुळे MIच्या फिरकीपटूनं दमदाम कामगिरी केली! नेमक्या त्या Tips होत्या तरी काय?