IPL 2022: Sachin Tendulkar च्या मदतीमुळे MIच्या फिरकीपटूनं दमदार कामगिरी! नेमक्या त्या Tips होत्या तरी काय?

Murugan Ashwin on Sachin Tendulkar : एकीकडे मुरुगन अश्विननं जबरदस्त कामगिरी केली खरी. पण मुंबईचे इतर गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. बुमराहने 3.2 ओव्हरमध्ये 43 धावा केल्यात. बासिल थंपनीने 3 विकेट्स घेतल्या. पण...

IPL 2022: Sachin Tendulkar च्या मदतीमुळे MIच्या फिरकीपटूनं दमदार कामगिरी! नेमक्या त्या Tips होत्या तरी काय?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 8:01 PM

मुंबई : IPL 2022मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पहिल्याच सामन्यात पुन्हा एकदा पराभूत झाली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं विजय अक्षरशः खेचून आणला. अक्षर पटेल आणि ललित यादव यांच्या भागीदारीनं दिल्लीचं (Delhi Capitals) मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना फारसं यश मिळू शकलं नाही. एक गोलंदाज सोडला, तर बाकीच्या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांनी चांगलंच धुतलं. पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव जरी झालेला असला, तरिही मुंबईसाठी पहिल्या सामन्यात एक सकारात्मक बाब समोर आली. एकीकडे 14 ओव्हरमध्ये सहा विकेट 104 धावांवर दिल्लीच्या गेल्या होत्या. अशावेळी विजय निश्चित मानला जात असतानाही मुंबईचा पराभव झाला. डॅनियल्स सॅम्सनं अवघ्या चार ओव्हरमध्ये तब्बल 57 धावा दिल्लीनं कुटल्या होत्या. तर दुसरीकडे एका मुंबई इंडियन्सच्या संघातील एका फिरकी पटूनं दिल्लीला चार ओव्हरमध्ये अवघ्या 14 धावा दिल्या आणि दोन विकेट्सही घेतल्यात. या फिरकीपटूचं नाव आहे, मुरुगन अश्वीन (Murugan Ashwin).

मुरुगन अश्विननं ब्रेबॉर्नच्या स्टेडिअममध्ये फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. या सामन्यामध्ये मिळालेल्या यशाचं सगळं श्रेय मुरुगन अश्विननं सचिन तेंडुलकरला दिलेत. सचिन तेंडुलकरनं मुरुगन अश्विनला खास टीप्स दिल्या होत्या. या टीप्समुळे आपल्याला ब्रेबॉनच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना यश मिळालं, असं त्यानं म्हटलंय. मुरुगन अश्विननं म्हटलंय की, …

मला खूप आनंद आहे, की मुंबई इंडियन्स संघाच्या वतीनं मला खेळण्याची संधी मिळली. मी या टीमचा चाहता आहे. सचिन तेंडुलकरनं आपल्या डेब्यू कॅप दिली. मला सचिनकडून डेब्यू कॅप मिळेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. यावेळी मला सचिनसोबत बोलण्याची संधी मिळाला. सचिनला मी सांगितलं की मी कधीच ब्रेबॉर्नवर खेळो नाहीये. तेव्हा सचिननं मला ब्रेबॉर्न स्टेडिअमच्या बाबत माहिती दिली.

मुरुगन अश्विनची फिरकी जोमात

एकीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांनी जसप्रीत बुमराह आणि डॅनियअ सॅम्स यांची धुलाई केली होती. या दिग्गज गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या टिम साईफर्टची विकेट मुरुगननंच काढली होती. एका गुगलीवर साईफर्टला क्लिन बोल्ड करण्यात मुरुगनला यश आलं होतं. यानंतर मनदीप सिंहलाही मुरुगनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. अश्विननं चार ओव्हरमध्ये 14 धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट्सही काढल्या होत्या.

पाहा मुरुगन काय म्हणाला?

मुंबईच्या इतर गोलंदाज ठरले महागडे!

एकीकडे मुरुगन अश्विननं जबरदस्त कामगिरी केली खरी. पण मुंबईचे इतर गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. बुमराहने 3.2 ओव्हरमध्ये 43 धावा केल्यात. बासिल थंपनीने 3 विकेट्स घेतल्या. पण 4 ओव्हरमध्ये 35 रनही दिले. मुंबईची गोलंदाजी कमकुवत ठरणार की काय अशी चर्चा आता सुरु झाली आहे. याबाबत जेव्हा मुरुगन अश्विनला विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं मुंबई इंडियन्सचा बॉलिंग लाईनअप चांगला असून लवकरच हा संघ पुन्हा जोमानं कामगिरी करुन दाखवेल, असा विश्वास बोलवून दाखवला आहे. आता मु्ंबईची पुढची मॅच ही रायस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. 2 एप्रिलला आता मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थानसोबत होईल.

संबंधित बातम्या :

Jasprit Bumrah Mumbai Indians: “छोडा ना यार, ये बुमराह-वुमराह क्या करेगा?”, विराट कोहलीने धुडकावला होता सल्ला

IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?

Who Is Lalit Yadav: ललित यादवमुळे पुन्हा मुंबईची पहिली मॅच ‘देवाला’, त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याची किमया दोनदा केलीय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.