AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका PNR वर एकापेक्षा जास्त तिकिटांची बुकिंग, एकाला रद्द करायचे असेल तर अशी आहे प्रक्रिया

ग्रुपने रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर जर एखाद्याचे तिकीट रद्द करायचे असले तर काय कराल? जाणून घ्या प्रक्रिया

एका PNR वर एकापेक्षा जास्त तिकिटांची बुकिंग, एकाला रद्द करायचे असेल तर अशी आहे प्रक्रिया
भारतीय रेल्वे Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 09, 2022 | 6:01 PM
Share

मुंबई, बऱ्याचदा ग्रुपने प्रवास करताना एकत्रच तिकीट काढण्यात येते. अशा वेळी  एकाच पीएनआरवर (One PNR) एकापेक्षा जास्त जणांची रेल्वेची तिकीट काढण्यात येते. यामध्ये प्रत्येक प्रवाशाला वेगळे तिकीट लागत नाही. पण जर एखाद्याचा प्लॅन बदलला आणि त्याने ट्रिप रद्द केली तर? अशा परिस्थितीत त्याचे तिकीट रद्द (Cancel Railway Ticket) करावे लागेल, अन्यथा प्रवास न करता त्याचे पैसे कापले जातील. एकाच पीएनआरवर अनेक लोकांची तिकिटे असल्याने ज्या प्रवाशाला प्रवास करायचा नाही तो काय करणार? यासाठीच नियम थोडा वेगळा आहे हे. जाणून घेऊया याची प्रक्रिया (Online Process).

तिकिटांचे बुकिंग रेल्वे काउंटरवरून होत असेल, तर कॅन्सलही काउंटरवरच करावे लागेल. जर तिकीट बुकिंग आयआरसीटीसीच्या ई-तिकीटिंग वेबसाइटवरून केले असेल, तर तिकीट ऑनलाइन सहजपणे रद्द केले जाऊ शकते. जर तुम्हाला अनेक तिकिटांपैकी एखादे तिकिट रद्द करायचे असेल तर त्याला आंशिक रद्द करणे म्हणतात. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयआरसीटीसी चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म तिकीट रद्द करण्याची सुविधा देते. तिकीट बुकिंग ऑनलाइन झाल्यामुळे हे काम तुम्हाला ऑनलाइन करावे लागेल हे लक्षात ठेवा.

याची नेमकी प्रक्रिया आपण जाणून घेऊया

  1. सर्व प्रथम IRCTC ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in उघडा
  2. योग्य लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून येथे लॉग इन करा
  3. आता साइन-इन पर्यायावर क्लिक करा
  4. आता तुमचे ई-तिकीट रद्द करण्यासाठी, “My Transaction” वर जा आता, My Account मेनू अंतर्गत बुक केलेल्या तिकीट इतिहास (History) लिंकवर क्लिक करा.
  5. तुम्हाला तुमची बुक केलेली तिकिटे विभागात दिसतील
  6. आता तुम्हाला रद्द करायचे असलेले तिकीट निवडा आणि रद्द करा (Cancel) या पर्यायावर क्लिक करा
  7. ज्या प्रवाशांची तिकिटे रद्द करायची आहेत त्यांची नावे निवडून रद्द करणे सुरू करा
  8. आता प्रवाशाच्या नावासमोरील चेक बॉक्स निवडा आणि “cancel ticket” बटणावर क्लिक करा
  9. रद्दीकरणाची पुष्टी करण्यासाठी पुष्टीकरण पॉप वर क्लिक करा
  10. एकदा प्रक्रिया यशस्वी झाली की, रद्दीकरण शुल्क कापले जाईल. तिकिटाचे पैसेही तुमच्या खात्यात परत केले जातील.
  11. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेलवर एक पुष्टीकरण एसएमएस आणि रद्दीकरण ईमेल देखील प्राप्त होईल.
Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं