Inflation : व्यवसायिक एलपीजी सिलिंडर दरवाढीचा फटका; हॉटेल, लग्नातील जेवण महागण्याची शक्यता

महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. गॅस महागल्याने आता हॉटेलमधील जेवणाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.

Inflation : व्यवसायिक एलपीजी सिलिंडर दरवाढीचा फटका; हॉटेल, लग्नातील जेवण महागण्याची शक्यता
गॅसवरील सबसीडी कशी मिळवाल?
Image Credit source: TV9
| Updated on: May 02, 2022 | 8:36 AM

मुंबई : महागाई (Inflation) वाढतच आहे. देशात गेल्या काही दिवसांमध्ये महागाई सर्वोच्च स्थरावर पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक धक्का बसला असून, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) दरात मोठी भाव वाढ करण्यात आली आहे. एक मे पासून व्यवसायिक एलपीजी सिलिंडर तब्बल 104 रुपयांनी वाढला आहे. व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने त्याचा परिणाम आता हॉटेलमधील (Hotel) जेवणार होणार असून, हॉटेलिंगचा खर्च ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. सोबतच लग्नामधील जेवन देखील महागण्याची शक्यता आहे. आधीच इंधनाच्या दरांमुळे वाढलेल्या वाहतूक खर्चात व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हॉटेलमधील जेवन तसेच लग्नाचा खर्च वाढू शकतो. गेल्या दोन महिन्यात व्यवसायिक सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा का होत नाही दिलासा मिळाला आहे. मात्र व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या एप्रिल महिन्यात व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 268 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या धक्क्यातून व्यवसायिक सावरता आहेत तोच एक मे रोजी रविवारी पुन्हा एकदा व्यवसायिक सिलिंडरच्या दरता 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता निळ्या कलरच्या व्यवसायिक सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 2 हजार 355 रुपयांवर पोहोचली आहे. सिलिंडरचे दर वाढल्याने जेवणाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.

मिठाई आणि बाजारातील खाद्यपदार्थांचे दर देखील महागणार

एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढल्याने, वाहतूक खर्च वाढला आहे. दुसरीकडे व्यवसायिक सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मिठाई आणि बाजारात मिळणाऱ्या इतर खाद्यपदार्थांचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे व्यवसायातील मार्जीन कमी झाल्याची प्रतिक्रिया सध्या अनेक व्यापारी देत आहेत.