
प्रत्येकाला दिवसातून किमान एक किंवा दोनदा तरी बँकेकडून क्रेडिट कार्डसाठी फोन येतो. अनेकवेळा तुम्ही त्यांना नकार देऊनही त्यांचा फोन यायचा काही बंद होत नाही. बँक इतर कोणत्या गोष्टींसाठी नाहीपण क्रेडिट कार्डसाठी मागे लागतात. शॉपिंग मॉल, स्टेशन किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी काही तरूण-तरूणी क्रेडिट कार्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचं हे समजून सांगत असतात. याच्यामागे कारणंही तितकंच मोठं आहे. क्रेडिट कार्डचं महाजाल देशभरात पसरलंय. पण तुम्हाला माहिती का तुमच्या खिशातील क्रेडिट कार्डने किती जणांना फायदा होतो? जाणून घ्या. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? बँक तुम्हाला एक असं कार्ड देते ज्यामध्ये एक ठराविक रक्कम दिली जाते. ती रक्कम तुम्ही एक महिन्साठी कोणत्याही व्याजाशिवाय वापरू शकता. मात्र ठरलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला ती रक्कम भरावी लागते. ग्राहकांना वारंवार पैसे काढण्यासाठी बँकेत यावं लागू नये यासाठी डेबिट कार्ड दिलं. त्यानंतर ग्राहकांना एक मिनी लोनसारखी सेवा देण्यासाठी क्रेडिट कार्ड दिलं गेलं. ...