AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जाने झालात हैराण, कर्जबाजारी होण्यापूर्वी करा की हा उपाय

Debt Trap | अनेक वस्तू घेण्यासाठी, वारेमाप खर्चासाठी आपण अनेकदा कर्ज घेतो. कर्ज घेताना खिशाला झळ बसत नाही. कर्ज फेडताना मात्र दमछाक होते. अनेक ग्राहकांना वैयक्तिक कर्ज फेडताना आपण फसल्या अथवा फसवल्या गेल्याचे लक्षात येते. अशावेळी या कर्जाच्या विळख्यातून कसे बाहेर पडणार...

कर्जाने झालात हैराण, कर्जबाजारी होण्यापूर्वी करा की हा उपाय
| Updated on: Jan 06, 2024 | 3:17 PM
Share

नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : अनेकदा एखादी वस्तू खरेदीसाठी अथवा उधळा स्वभाव असेल तर वैयक्तिक कर्जाच्या जाळ्यात ती व्यक्ती अलगद अडकते. मग कर्ज फेडताना त्याची दमछाक होते. हळूहळू ती व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात फसते. एकदा पठाणी वसूली सुरु झाली की त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. सर्वच बाजूने त्याची दमकोंडी होते. त्यामुळे कर्जाच्या या जाळ्यात न अडकता त्यातून लवकर बाहेर पडणे आवश्यक असते. पर्सनल लोनसाठी सर्वाधिक व्याज मोजावे लागते. त्यामुळे अत्यंत निकड असेल आणि भविष्यात आर्थिक तरतूद असेल तर असे कर्ज घेणे योग्य ठरते.

वैयक्तिक कर्जाचा तिढा असा सोडवा

  • कर्जाचे हप्ते थकले असतील तर बँक, वित्तीय संस्थेकडून काही कालावधी मागून घ्या
  • बँकेला ई-मेलवर विनंती करा अथवा लोन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला भेटा
  • त्याला ईएमआय कमी करण्याची विनंती करा. ईएमआय भरण्यासाठी वेळ मागून घ्या
  • बँलन्स ट्रान्सफरची विनंती करा. त्यात बँक नवीन कर्जाद्वारे जूने कर्ज फेडते
  • रक्कम जास्त असेल. पर्याय नसेल तर लोन सेटलमेंट हा पर्याय आहे.
  • लोन सेटलमेंटसाठी तुम्हाला खास कारण द्यावे लागेल
  • घरातील किंमती आणि इतर काही वस्तूंची विक्री करुन कर्ज फेडा
  • एकापेक्षा जास्त कर्ज असतील तर जास्त व्याजाचे कर्ज बंद करा
  • कर्जाला घाबरु नका, ते फेडण्याचा विचार करा
  • उधळपट्टीला आवर घाला. गरजेपुरताच पैसा खर्च करा
  • जादा मेहनत करुन,  इतर काही काम करुन रक्कम जमा करा

कर्जाच्या जाळ्यात अडकलात हे कसे ओळखाल?

  • तुमचा खर्च कमाईपेक्षा अधिक असेल
  • क्रेडिट कार्डवर जादा उधार खरेदी सुरु असेल
  • क्रेडिट कार्डवर कर्ज फेडीसाठी अडचण येत असेल
  • तुमची जास्तीत जास्त कमाई ईएमआयसाठी खर्ची पडत असेल तर
  • ईएमआय वेळेवर भरु शकत नसाल अथवा बिल वेळेवर भरता येत नसेल तर
  • एका कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घ्यावे लागत असेल तर
  • महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वच पैसा संपत असेल तर
  • महिन्याच्या शेवटचा आठवडा अत्यंत हालाकीचा असेल तर

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत