पर्सनल लोन हवं आहे चिंता करू नका; ‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त लोन ते देखील अगदी कमी प्रोसेसिंग फीमध्ये

| Updated on: Feb 22, 2022 | 6:48 AM

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीनाकधी अतिरिक्त पैशांची गरज भसते, त्याची कारणे अनेक असू शकतात. अशावेळी संबंधित व्यक्ती पर्सनल लोनचा (Personal loan) पर्याय निवडतो. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची माहिती देणार आहोत ज्या बँकांनी पर्सनल लोनसाठी आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर दिलया आहोत.

पर्सनल लोन हवं आहे चिंता करू नका; या बँका देतायेत सर्वात स्वस्त लोन ते देखील अगदी कमी प्रोसेसिंग फीमध्ये
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधीनाकधी अतिरिक्त पैशांची गरज भसते, त्याची कारणे अनेक असू शकतात. अशावेळी संबंधित व्यक्ती पर्सनल लोनचा (Personal loan) पर्याय निवडतो. मिळालेल्या पैशांमधून तो आपली आर्थिक गरज (Financial need) भागवत असतो. मात्र अनेकवेळा बँकांकडून (bank) पर्सनल लोनवर अव्वाच्या सव्वा कर्ज आकारले जाते. अशा स्थितीमध्ये संबंधीत व्यक्तीला घेतलेल्या कर्जापेक्षा कितीतरी अधीक पैसे व्याजाच्या रुपयाने भरावे लागतात. त्यामुळे कुठल्याही बँकेमधून लोन घेतलाना सर्वप्रथम त्या बँकेचा पर्सन लोनवरील व्याज दर किती आहे. तो आपण भरू शकतो का याचा विचार करायला हवा. अनेकवेळा असे होते की, एकच बँक एकाच प्रकरारचे कर्ज दोन वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या व्याज दराने देते. त्याचे महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते. अन्यथा तुमच्याकडून अधिक व्याज दर आकारला जातो. त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर कसा चांगला राहील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. आज आपण अशा काही बँकांची माहिती घेणार आहोत जिथे तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध होऊ शकते.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशल बँकेने पर्सनल लोनसाठी त्यांच्या ग्राहकांना चांगली ऑफर दिली आहे. सध्या पंजाब नॅशल बँकेमध्ये आपल्या ग्राहकांना 7.90 ते 14.15 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून ते 31 मार्चपर्यंत तुमच्याकडून कर्जावर कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाहिये.

इंडियन बँक

तुम्ही जर इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला बँकेकडून 9.05 ते 3.65 टक्के व्याज दराने कर्ज मिळू शकते. अर्थात हे तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे त्यावर अवलंबून आहे. इंडियन बँकेकडून कर्जावर एक टक्का प्रोसेसिंग फी आकारली जाते.

यूनियन बँक ऑफ इंडिया

यूनियन बँक ऑफ इंडियाकडून सध्या पर्सनल लोनवर 9.30 ते 13.40 टक्के व्याज दर आकारण्यात येत आहे. तर प्रोसेसिंग चार्ज म्हणून तुम्ही घेतलेल्या एकूण कर्जातून 0.50 टक्के रक्कम कट होते.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रकडून आपल्या ग्राहकांना पर्सनल लोनसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेकडून ग्राहकांना 9.45 ते 12.80 टक्के व्याजाने लोन मिळू शकते. यासाठी बँकेकडून प्रोसेसिंग फी म्हणून एकूण कर्जाच्या एक टक्का रक्कम आकारली जाते.

आयडीबीआय बँक

आयडीबीआय बँकेकडून ग्राहकाना 9.50 ते 14 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रोसेसिंग फीस म्हणून कमीत कमी 2,500 रुपये व जास्तीत जास्त लोनच्या एक टक्का एवढी फी आकारली जाते.

संबंधित बातम्या

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय ? फायदे अन् तोटे माहिती करून घ्यायला हवं! आधी जाणून घ्या मग खुशाल वापर करा…

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची उद्या कॉनक्लेव्ह’

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!