शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय ? फायदे अन् तोटे माहिती करून घ्यायला हवं! आधी जाणून घ्या मग खुशाल वापर करा…

शॉपिंग क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे को-ब्रँड यांना आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सेल आणि विशेष प्रसंगी आपल्याला या कार्डवर खरेदी करताना स्पेशल डिस्काउंट देखील मिळतो.

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय ? फायदे अन् तोटे माहिती करून घ्यायला हवं! आधी जाणून घ्या मग खुशाल वापर करा...
credit cardImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 1:49 AM

मुंबईः आपल्यापैकी प्रत्येकाला खरेदी करायला आवडत असते. असा एखादा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल की, त्याला शॉपिंग करायला आवडत नाही. जर तुम्ही नेहमी शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आपल्यापैकी अनेक जण शॉपिंग करताना शॉपिंगचे वेगवेगळे मोड वापरत असतात. काहीजण ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करतात. काहीजण ऑफलाइन पद्धतीचा प्रामुख्याने वापर करत असतात. जर शॉपिंग करणे तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन साठी तुम्ही शॉपिंग क्रेडिट कार्ड (Shopping Credit Cards) अवश्य वापरू शकतात आणि हा पर्याय तुमच्यासाठी अतिशय सोयीस्कर सुद्धा ठरू शकतो.

जे लोक नेहमी वेगवेगळ्या प्रसंगी शॉपिंग करत असतात त्यांनी रेगुलर क्रेडिट कार्ड(Credit Cards) ऐवजी शॉपिंग क्रेडिट कार्डचा वापर करायला हवा. या शॉपिंग कार्डचा आपण वापर केला तर आपल्याला रिवॉर्ड पॉइंट सुद्धा जास्त मिळतात. सोबतच स्पेशल बोनस आणि एखाद्या ब्रॅण्ड वर डिस्काउंट सुद्धा ऑफर केला जातो. अन्य कार्डप्रमाणे या शॉपिंग कार्ड वर ईएमआय (EMI) चा पर्याय देखील उपलब्ध असतो. चला तर मग जाणून घेऊया, शॉपिंग क्रेडिट कार्ड नेमके काय असते? हे कार्ड वापरल्याने आपल्याला कोणकोणते फायदे तसेच तोटे होतात त्याबद्दल….

शॉपिंग कार्डचा वेगवेगळ्या ब्रँड सोबत करार

मिंट मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्ट मध्ये, पैसा बाजारचे एसोसिएट डायरेक्टर सचिन वासुदेव यांनी सांगितले की , शॉपिंग क्रेडिट कार्ड रेग्युलर क्रेडिट कार्ड पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या कार्डला शॉपिंगचा मुद्दा लक्षात ठेवूनच तयार करण्यात आले आहे. हे कार्ड वापरल्याने युजरला खूप सारे फायदे मिळतात. काही फायदे एक्सक्लूसिव स्वरूपाचे असतात. शॉपिंग क्रेडिट कार्डचा वापर केल्यास रिवॉर्ड पॉइंट सुद्धा जास्त मिळतात. या शॉपिंग कार्डचा वेगवेगळ्या ब्रँड सोबत करार देखील असतो. जर आपण या ब्रँडचे विशिष्ट असे प्रोडक्ट खरेदी केल्यास आपल्याला स्पेशल डिस्काउंट देखील मिळतो. जर तुम्ही शॉपिंग करत असताना ऑनलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरेल. खरेदी प्रेमींची आवड व गरज लक्षात ठेवूनच या कार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

चार्जेस रेट सारखेच असतात…

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे अन्य क्रेडिट कार्ड प्रमाणेच या कार्डावर सुद्धा इंटरेस्ट पेमेंट आणि पेनल्टी संबंधित चार्जेस सारखेच असतात. जर तुम्ही या शॉपिंग कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर कधीच लेट पेमेंट करू नका. कमीत कमी पेमेंट आपल्याला आवश्य पूर्ण केले पाहिजे. मायमनीमंत्र डॉटकॉम चे राज खोसला यांचे म्हणणे आहे की, शॉपिंग क्रेडिट कार्डसाठी आपल्याला जोईनिंग फी,वार्षिक मेंटेनन्स चार्जेस, लेट पेमेंट फी,वार्षिक परसेंट रेट ओवरड्यू पेमेंट,ओवर लिमिट फी इत्यादी प्रकारची चार्जेस आपल्याला द्यावे लागतात.

शॉपिंग क्रेडिट कार्ड संबंधित या गोष्टी प्रत्येकाने जाणून घ्यायला हव्यात

शॉपिंग क्रेडिट कार्डच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक क्रेडिट कार्ड प्रमाणे या कार्ड मध्ये सुद्धा युजर असला 50 दिवसांचा इंट्रेस्ट फ्री कालावधी मिळतो. बिल जेनरेट झाल्यानंतर सुद्धा तीन आठवड्याचा वेळ पेमेंट साठी मिळतो.

पॉईंटच्या मदतीने चांगली सेविंग

शॉपिंग क्रेडिट कार्डचा वापर केल्याने रिवॉर्ड पॉइंट सुद्धा आपल्याला जास्त मिळतात. याचा थेट मॉनिटर बेनिफिट आपल्याला मिळत नाही परंतु पॉइंटला रीडीम केले जाऊ शकते. या पॉईंटच्या मदतीने तुम्ही चांगली सेविंग सुद्धा करू शकतात. या कार्डच्या मदतीने शॉपिंग ही मर्यादित आपल्या क्षमतेनुसारच करायला हवी.

पेट्रोलसाठी वेगळी स्पेशल कार्ड

क्रेडिट कार्ड बनवणाऱ्या कंपनीचे मोठ – मोठ्या ब्रॅंड सोबत करार असतात. या मोठ्या ब्रॅंडने बनवलेल्या उत्पादनाची आपण खरेदी केली तर आपल्याला स्पेशल डिस्काउंट सुद्धा मिळतो. शॉपिंग क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी एक गोष्ट तपासून घ्यायला हवी की, आपण जास्त शॉपिंग कुठे अन् केव्हा करतो. जर तुम्ही शॉपिंगपेक्षा पेट्रोल पंपावर पेट्रोल जास्त भरत असाल तर त्यासाठी सुद्धा वेगळी स्पेशल कार्ड उपलब्ध आहेत.

स्पेशल डिस्काउंट सुद्धा ऑफर

शॉपिंग क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा को – ब्रँड यांना असतो ,यामुळे सेल आणि विशेष प्रसंगी आपल्याला या ब्रँड द्वारे स्पेशल डिस्काउंट सुद्धा ऑफर केला जातो.

मोठ्या रकमेला सहजच ईएमआयमध्ये

बँक बाजारचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या मते, शॉपिंग क्रेडिट कार्डच्या मदतीने मोठ्या रकमेला सहजच ईएमआय मध्ये आपण बदलू शकतो. हे फिचर रेगुलर कार्डच्या तुलनेत खूपच प्रभावी आहे.

संबंधित बातम्या

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची उद्या कॉनक्लेव्ह’

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!

SHARE MARKET UPDATE: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 150 अंकांनी गडगडला; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.