अवघ्या 5000 रुपयांत सुरु करा व्यवसाय आणि महिन्याला कमवा बक्कळ पैसे

| Updated on: Oct 31, 2021 | 11:42 AM

अलीकडच्या काळात कुल्हडमधील चहा विशेष लोकप्रिय आहे. कुल्डडमधून चहा पिण्याचा ट्रेंड उच्चभ्रू वर्तुळातही रुजला आहे. त्यामुळे अगदी रस्त्यावरील टपरीपासून, मेट्रो-रेल्वे स्टेशन आणि विमानतळापर्यंत कुल्डडमधून चहा मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.

अवघ्या 5000 रुपयांत सुरु करा व्यवसाय आणि महिन्याला कमवा बक्कळ पैसे
कुल्हड चहा
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांवर घरी बसायची वेळ आली. यापैकी अनेकांनी आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला होता. तुम्हालादेखील चाकोरीबाहेर जाऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी चहासाठी लागणाऱ्या मातीच्या भांड्यांचा (कुल्हड) व्यवसाय अगदी योग्य ठरू शकतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही फार मोठी जोखीम न पत्कारता व्यवसायाच्या क्षेत्रात आपले नशीब आजमवू शकता.

अलीकडच्या काळात कुल्हडमधील चहा विशेष लोकप्रिय आहे. कुल्डडमधून चहा पिण्याचा ट्रेंड उच्चभ्रू वर्तुळातही रुजला आहे. त्यामुळे अगदी रस्त्यावरील टपरीपासून, मेट्रो-रेल्वे स्टेशन आणि विमानतळापर्यंत कुल्डडमधून चहा मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.

केंद्रातील मोदी सरकारही कुल्हडची मागणी वाढविण्यावर भर देत आहे जेणेकरून आपल्या व्यवसायाशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढू शकेल. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कुल्हडच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टिक आणि पेपर कपमध्ये चहा देण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

कुल्हड व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कुंभार सक्षमीकरण योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील कुंभारांना इलेक्ट्रिक चाके देते. त्यापासून ते कुल्हाडासह सर्व मातीची भांडी बनवू शकतात. याशिवाय, सरकारकडून या भांड्याची खरेदीही केली जाते.

कमी भांडवल लागणारा व्यवसाय

सध्याचे युग पाहता हा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करता येतो. यासाठी तुम्हाला थोडी जागा तसेच 5,000 रुपये लागतील. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार, 2020 मध्ये केंद्र सरकारने देशातील कुंभारांना 25 हजार इलेक्ट्रिक चाकांचे वाटप केले होते.

कुल्हड किती रुपयांन विकले जाते?

चहा कुल्हड अतिशय किफायतशीर असण्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही सुरक्षित आहे. चहा कुल्हडची किंमत पन्नास ते शंभर रुपये आहे. त्याचबरोबर लस्सी कुल्हडची किंमत 150 रुपये शंभर, दुधाच्या कुल्हडची किंमत 150 रुपये आणि एका कपची किंमत 100 रुपये आहे. सण आणि लग्नाच्या काळात त्यांची मागणी वाढते. मागणी वाढल्यास त्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या शहरांमध्ये कुल्हड चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत आहे. व्यवसाय नीट चालवला आणि कुल्हड विकण्यावर व्यवस्थितपणे लक्ष केंद्रित महिन्याकाठी चांगली कमाई होऊ शकते.

संबंधित बातम्या:

वडील विकायचे फळं, मुलाने बनवलं ‘नॅचरल्स आईस्क्रीम’; उभारला 300 कोटींचा व्यवसाय

गुजरातच्या तरुणाने आई-वडिलांकडून 8000 रुपये उधार घेऊन टाकली चहाची टपरी; अवघ्या चार वर्षात कोट्यधीश

तीन लाखांच्या भांडवलात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रुपये