नवी दिल्ली : भारताच्या औषधी नियंत्रकांनी (DCGI) आता नियम अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, आता दुसऱ्याच्या लायसन्सवर (Licence) तुम्हाला कमाई करता येणार नाही. याविषयीचे नियम आता अधिक कडक करण्यात येणार आहे. DCGI ने सर्व राज्यातील औषध नियंत्रक, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाला याविषयीचे पत्र पाठवले आहे. रिटेल मेडिकल स्टोअरमध्ये (Medical Store) फार्मासिस्टने स्वतः असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे (DCGI) डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, रिटेल फार्मसी अॅक्ट, 1947 चे कलम 42 (a) आणि ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स अॅक्ट 1945 च्या नियमानुसार, कारवाई करण्यात येईल.