नवी दिल्ली : जगभरातील अब्जाधीशांनी (Millionaires Migration) , कोट्याधीशांनी राहण्यासाठी आणि त्यांच्या उद्योगाची कार्यालये सुरु करण्यासाठी नवीन डेस्टिनेशन हुडकले आहे. या श्रीमंतांचा न्यूयॉर्क, मॉस्को, बीजिंग, मुंबईत जीव रमत नसल्याने त्यांनी नवीन शहर निवडले आहे. जगभरात या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरु आहे. या कोट्याधीशांना अशी काय ऑफर मिळाली, असे काय गवसले की त्यांना त्यांचा देश सोडून या तीन शहरांची भूरळ पडली याविषयी जगभरात चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा स्थलांतराचा ट्रेंड (Migration Trends) सुरु आहे. यापूर्वी ब्रेन ड्रेनची चर्चा होत होती, आता या मायग्रेशन ट्रेंडचं वारं आलं आहे.