Richest Women : 14,000 कोटींच्या संपत्तीची मालकिण! ही आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला

Richest Women : फ्रेंच कंपनी लॉरियलची मालकीण फ्रेंकोइस बेटनकार्ट मेयर्स या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. मग भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत आणि इतर अब्जाधीश महिलांची नावे तुम्हाला माहिती आहेत का?

Richest Women : 14,000 कोटींच्या संपत्तीची मालकिण! ही आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला
श्रीमंत महिला
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 4:48 PM

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक श्रीमंत महिला कोणत्या देशात आहेत? अर्थातच अमेरिकेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला अमेरिकेत (Female Billionaires List) राहतात. सिटी इंडेक्सने (City Index) आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधत ही यादी तयार केली होती. ही यादी तयार करताना फोर्ब्स लाईव्ह बिलेनिअर ट्रेकरची (Forbes live billionaire tracker) मदत घेण्यात आली आहे. सिटी इंडेक्सनुसार, अब्जाधीश महिलांच्या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग हे संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत. जगातील पाच श्रीमंत महिलांपैकी 4 अब्जाधीश या अमेरिकेत राहतात. फ्रेंच कंपनी लॉरियलची मालकीण फ्रेंकोइस बेटनकार्ट मेयर्स या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 81.49 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वॉलमार्टच्या एलिस वाल्‍टन या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 60.16 अब्ज डॉलर इतकी आहे.

जगातील श्रीमंत महिला

  1. एकट्या अमेरिकेत 92 महिला अब्जाधीश आहेत.
  2. या यादीत दुसऱ्या स्थानावर चीनचा क्रमांक येतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. चीनमध्ये अमेरिकेच्या तुलनेत अर्ध्या महिला अब्जाधीश आहेत. चीनमध्ये 46 महिला अब्जाधीश आहेत.
  5. जर्मनीचे नाव या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीत एकूण 32 महिला अब्जाधीश आहेत.
  6. त्यानंतर इटलीचा क्रमांक लागतो. इटलीमध्ये 16 अब्ज महिला अब्जाधीश आहेत.
  7. भारतात 9 महिला अब्जाधीश आहेत. एवढीच संख्या ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग या देशांची आहे.
  8. या यादीत हे तीनही देश संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
  1. सावित्री जिंदल फोर्ब्‍स रिच लिस्‍ट 2022 अनुसार, ओपी जिंदल समूहाच्या संचालिका सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 16.96 अब्ज डॉलर (जवळपास 14 हजार कोटी) इतकी आहे. सावित्री जिंदल या यशस्वी उद्योजिका आहेत. त्या राजकारणताही सक्रीय आहेत.
  2. विनोद राय गुप्ता या भारतातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या हॅवेल्स इंडियाच्या (Havells India) व्यवस्थापकीय संचालक अनिक गुप्ता यांच्या आई आहेत. त्यांची एकूण संपत्ती 6.3 अब्ज डॉलर इतकी आहे.
  3. रेखा झुनझुनवाला शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांच्या रेखा झुनझुनवाला या पत्नी आहेत. 2022 मधील फोर्ब्स इंडिया रिच नुसार, त्या भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर आहे.
  4. फाल्गुनी नायर नायका या कंपनीच्या सीईओ आहेत, त्यांचे  नाव पण श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांची एकूण संपत्ती 4.08 अब्ज डॉलर आहे.
  5. लीना तिवारी फार्मा आणि बायोटेक कंपनी USV प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीण आहेत.  भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.
  6. दिव्या गोकुलनाथ यांचे नावही श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. वर्ष 2011 मध्ये त्यांनी BYJU कंपनीची स्थापना केली होती. त्यांचे नेटवर्थ सध्या 3.6 अब्ज डॉलर इतके आहे.
  7. मल्लिका श्रीनिवासन या ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या सीईओ आहेत. त्यांचे नाव भारताच्या 2022 मधील फोर्ब्स इंडिया रिचच्या यादीत आहे. त्यांची एकूण संपत्ती 3.4 अब्ज डॉलर इतकी आहे.
  8. किरण मजूमदार-शॉ बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड या कंपन्याच्या संस्थापक आहेत. किरण मजूमदार-शॉ यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचा आठवा क्रमांक लागतो.
  9. अनु आगा थर्मेक्स कंपनीची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी त्यांच्या मालकीची आहे. त्यांचे नाव 2022 मधील फोर्ब्स इंडिया रिचच्या यादीत आहे. त्यांची एकूण संपत्ती 2.8 अब्ज डॉलर इतकी आहे.

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.