Medicine : खूशखबर! महागड्या औषधांच्या बिलाला आता कात्री, देशात ही औषध होतील स्वस्त, सर्वसामान्यांना लवकरच दिलासा

Medicine : भारतात औषधं, गोळ्या पुन्हा स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळेल.

Medicine : खूशखबर! महागड्या औषधांच्या बिलाला आता कात्री, देशात ही औषध होतील स्वस्त, सर्वसामान्यांना लवकरच दिलासा
औषधी होणार स्वस्त
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 6:42 PM

नवी दिल्ली : पॅरासिटामोल हे गोळी प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. तुम्ही ही गोळी विविध ब्रँडच्या नावे घ्या, पण ती एकाच नावाने विक्री होते. ही गोळी ताप ते अंग दुःखी या सर्व आजारपणावर उपयोगी ठरते. आता या गोळीची किंमतही कमी होणार आहे. भारतात राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरण ( NATIONAL PHARMACEUTICAL PRICING AUTHORITY) देशातील औषधांची किंमत नियंत्रीत ठेवते. किंमती ठरवते. या प्राधिकरणाने आतापर्यंत 127 औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. किंमत कमी झालेली औषधं जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात औषधी दुकानांवर (Medical Shop) पोहचतील.

वृत्तानुसार, पॅरासिटामोलची किंमत अर्ध्यावर येऊ शकते. एमोक्सिसिलिन आणि पोटेशियम क्लेवनेट काम्बो (Amoxycillin and Potassium clavulanate ) या प्रतिजैविके (Antibiotic) तयार करणारी औषधी आहेत. या औषधांच्या एका गोळीची किंमत 6 रुपयांनी कमी होऊ शकते.

इतर औषधांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये अँटीबायोटिक मॉक्सीफ्लोक्सीन Moxifloxacin 400 MG या गोळीचा समावेश आहे. या गोळीची किंमत सध्या 31 रुपये आहे, ती लवकरच 21 रुपये होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

औषधांच्या किंमती घसरल्याचा मोठा फायदा सर्वसामान्य नागरिक, रुग्णांना लगेच होणार आहे. भारतात औषधांची किंमत ठरविण्याचे सूत्रच बदलण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. भारतातील चार संस्थांवर याविषयीच्या अभ्यासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या संस्था अभ्यास करुन याविषयीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करतील. सध्या औषधांच्या दरांवर केंद्र सरकारचे थेट कोणतेही नियंत्रण नाही. औषधी निर्मिती कंपन्या एका वर्षात भावात केवळ 10 टक्क्यांची वाढ करु शकतात, हाच एक नियम आहे.

सध्या केंद्र सरकार केवळ 886 फॉर्मूलेशन्सने तयार होणाऱ्या 1817 औषधांच्या भावावर अंकुश ठेऊ शकत आहे. देशात सध्या 20 हजार औषधी निर्मिती कंपन्या कार्यरत आहेत. तर काही औषधांवर या कंपन्या 200 ते 1 हजार पट नफा कमावितात.

सध्या देशात जनऔषधी, जनरिक औषधांची संख्या ही वाढली आहे. जनरिक मेडिकल स्टोअरची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे औषधांची संख्या किती कमी होऊ शकते, याचा अंदाज आला आहे. तसेच जनरिक औषधांवरील विश्वासही वाढीस लागला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.