नवी दिल्ली : भारतीय प्राप्तिकर खाते (Income Tax Department) देशातील लोकांच्या आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवते. जी व्यक्ती कर भरते, तिच्या आर्थिक व्यवहारांवर, आर्थिक कुंडलीचा हा विभाग बारकाईने अभ्यास करते. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आयटी रिटर्न (IT Return) भरणे अनिवार्य आहे. आयटीआर (ITR) भरणे त्याच्यासाठी एक कर्तव्यच आहे. आयकर खात्याने आयटीआरसंबंधी काही नियम तयार केले आहेत. जर तुम्ही पण आयकर खात्याच्या या नियमांकडे दुर्लक्ष केले, आयटीआर भरताना चूक केली तर त्याचा फटका तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. प्राप्तिकर खात्याची नोटीस (Notice) तुम्हाला घरबसल्या मिळू शकते.