
PF ATM Card : 2025 हे वर्ष पीएफधारकांसाठी, सदस्यांसाठी आनंदवार्ता घेऊन आले आहे. आता पीएफ ट्रान्सफरची झंझट संपली आहे. कारण ही प्रक्रिया आता पूर्णपणे स्वंयचलित होणार आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संगघटनेने (EPFO)
नवीन व्यवस्था लागू केली आहे. देशातील कोट्यवधी पीएफ खातेधारांना त्याचा लाभ होईल. आता पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना किचकट आणि दीर्घ प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही. विना अडचण ते लवकरच ऑटोमॅटिक त्यांचा पीएफ काढू शकतील.
कदाचित या वर्षांपासूनच पीएफ सदस्यांना, त्यांची भविष्यनिधी खात्यातील रक्कम हस्तांतरीत करण्यासाठी कोणता अर्ज द्यावा लागणार नाही. EPFO ने ही प्रक्रिया ऑटोमॅटीक करण्यासाठीची नवीन प्रणाली स्वीकारली आहे. त्यातंर्गत जेव्हा पण कर्मचारी नोकरी बदलेल तेव्हा त्यांना नवीन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्याची गरज नाही.
काय होईल फायदा?
ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफरमुळे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे सदस्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. त्यांचा दिवस मोडणार तर नाहीच पण त्यांना पीएफची रक्कम मिळण्यासाठी 15 दिवस आणि महिनाभर वाट पहावी लागणार नाही. याशिवाय त्यांना कागदपत्रे आणि अर्ज फाटे करावे लागणार नाही.
पीएफ ट्रान्सफरची ऑटोमॅटिक प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी EPFO ने एक नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. लवकरच हा प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांच्या सेवेत दाखल होईल. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खाते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत जोडल्या जाईल. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना त्याचे असे फायदे होतील.