AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाणून घ्या करोडपती बनण्याचा फॉर्मुला, भविष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

पगार कमी किंवा जास्त कितीही असला तरीही बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा पगार कमी असेल आणि तुमची बचत होत नसेल तर जाणून घेऊया कमी पगारात पैशाची बचत करण्यासाठी फॉर्मुला. जो फॉर्मुला वापरून तुम्ही दर महिन्याला एक चांगली रक्कम बचत करू शकतात. ज्या बचतीचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.

जाणून घ्या करोडपती बनण्याचा फॉर्मुला, भविष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: Jitendra Zavar | Updated on: Dec 15, 2024 | 1:33 PM
Share

सध्याच्या काळात पैसा हा सर्वात महत्त्वाचा झाला आहे. प्रत्येक व्यक्तीला आहे त्यापेक्षा जास्त पैसे हवे असतात. ज्यामुळे त्यांचे जीवन चांगल्या प्रकारे ते जगू शकतील. जे लोक मोठ्या प्रमाणात कमवतात ते सहज पैसे बचत करू शकतात पण दर महिन्याला कमी पैसे कमावणारे लोक पैसे बचत शकत नाहीत. तुम्हालाही पगार कमी मिळत असेल आणि या पगारातून पैसे बचत करणं जमत नाही. बचत करण्यासाठी एका फॉर्मुल्याबद्दल जाणून घेऊ जो फॉर्मुला वापरून तुम्ही कमी पगारातही बचत करू शकता.

कमी पगारात बचत बचत करण्याचा 50:30:20 हा फॉर्मुला

जर तुम्हाला कमी पगार असेल आणि तुमचा येणारा पगार पूर्ण खर्च होत असेल तर तुम्ही 50:30:20 हा फॉर्मुला वापरून सहज बचत करू शकता. 50, 30 आणि 20 म्हणजे टक्केवारी आहे. समजा तुम्ही दर महिन्याला 50 हजार रुपये कमवत असाल तर पगार तुमच्या खात्यात येताच तुम्ही तुमचा संपूर्ण पगार तीन भागांमध्ये विभागून घ्या. पगाराचा पहिला भाग 50 टक्के दुसरा भाग 30 टक्के आणि तिसरा भाग 20 टक्के असे भाग करा. तुमच्या येणाऱ्या महिन्याच्या पगाराचे अर्धे म्हणजेच 50% होतात 25 हजार रुपये फक्त अन्न, शिक्षण आणि इतर आवश्यक घरगुती गोष्टींसाठी खर्च करा. तुमचे सर्व हप्ते आणि घराचा किराया देखील यामध्येच समाविष्ट करा. आता पगारातील 30 टक्के रक्कम तुमचा प्रवास, कपडे, खरेदी आणि औषध उपचार यावर खर्च करा. त्यानंतर उर्वरित २० टक्के रक्कम बचतीसाठी ठेवा.

बचत अत्यंत महत्त्वाची

पगार कमी किंवा जास्त असला तरी देखील बचत करणे गरजेचे आहे. आपल्या पगारातील 20% रक्कम प्रत्येक व्यक्तीने बचत केली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या पगाराच्या दहा टक्के म्हणजेच महिन्याला दहा हजार रुपये बचत करून एस आय पी मध्ये गुंतवले तर तुमच्याकडे काही काळानंतर करोडो रुपये असतील.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?