AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 टक्के LPG गॅस सिलिंडर वाचेल, ‘या’ सोप्या टिप्स वापरून करा मोठी बचत

How to save LPG gas at home: आजच्या काळात एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेटवर मोठा ताण येतो. अनेकदा कळत-नकळत होणाऱ्या चुकांमुळे सिलिंडर वेळेआधीच संपतो. मात्र, स्वयंपाकघरातील काही साध्या बदलांमुळे आणि स्मार्ट सवयींमुळे तुम्ही गॅसची मोठी बचत करू शकता.

50 टक्के LPG गॅस सिलिंडर वाचेल, 'या' सोप्या टिप्स वापरून करा मोठी बचत
GAS CYLINDERImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2026 | 3:11 PM
Share

How to save LPG gas at home: तुमच्या घरातही गॅस सिलिंडर खूप लवकर संपतो का? महागाईच्या काळात सिलिंडर महिनाभर जास्त चालवायचा असेल, तर तुम्हाला ‘स्मार्ट कुकिंग’कडे वळावे लागेल. स्वयंपाकाची तयारी करण्यापासून ते भांड्यांच्या निवडीपर्यंत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा थेट परिणाम गॅसच्या वापरावर होतो. सिलिंडर वाचवण्याच्या काही अशाच खास टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

वाढत्या महागाईच्या काळात घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा आपण गॅस वाया घालवत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही. जर आपण आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतीत थोडा बदल केला, तर सिलिंडर 10 ते 15 दिवस जास्त चालू शकतो.

1. तयारी आधी, गॅस नंतर पेटवा बऱ्याचदा आपण गॅसवर कढई किंवा पातेले ठेवतो आणि मग भाजी चिरणे किंवा मसाला शोधणे सुरू करतो. यामुळे गॅस विनाकारण वाया जातो. नेहमी स्वयंपाकाची सर्व तयारी (भाजी चिरणे, मसाला तयार ठेवणे) आधी करून ठेवा आणि मगच गॅस पेटवा.

2. फ्रिजमधील वस्तू थेट गॅसवर ठेवू नका:

दूध, भाजी किंवा पीठ फ्रिजमधून काढल्याबरोबर लगेच गरम करायला ठेवू नका. थंड वस्तू गरम करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. फ्रिजमधील वस्तू किमान 30 मिनिटे बाहेर ठेवा आणि त्या सामान्य तापमानाला आल्यावरच गरम करा.

3. झाकण ठेवून स्वयंपाक करा

उघड्या भांड्यात स्वयंपाक केल्याने उष्णता हवेत निघून जाते आणि अन्न शिजायला वेळ लागतो. भांड्यावर झाकण ठेवल्यास वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि सुमारे 20 ते 30 टक्के गॅसची बचत होते.

4. पाण्याचा वापर मर्यादित ठेवा

जास्त पाणी टाकल्याने ते आटवण्यासाठी जास्त गॅस खर्च होतो. त्यामुळे आवश्यक असेल तितकेच पाणी वापरा. डाळी किंवा कडधान्ये शिजवण्यापूर्वी किमान 1-2 तास पाण्यात भिजत घातल्यास ते लवकर शिजतात.

5. प्रेशर कुकरचा वापर करा

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवणे हा गॅस वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. डाळ, तांदूळ किंवा भाज्या कुकरमध्ये शिजवल्याने वेळ आणि इंधन दोन्ही वाचते.

6. बर्नरची स्वच्छता

तुमच्या गॅसची Flame पिवळ्या रंगाची दिसत असेल, तर याचा अर्थ बर्नरमध्ये कचरा अडकला आहे. पिवळी ज्योत जास्त गॅस खर्च करते. नियमितपणे बर्नर स्वच्छ करा जेणेकरून निळी आणि तीव्र ज्योत मिळेल.

7. भांड्यांचा आकार आणि प्रकार

नेहमी बर्नरच्या आकारानुसार भांडी निवडा. लहान बर्नरवर मोठे भांडे ठेवल्यास कडांमधून उष्णता वाया जाते. तसेच, जाड तळाची भांडी वापरल्याने उष्णता जास्त वेळ टिकून राहते.

Follow Us
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...
मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही...
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही', बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण...तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
दार उघडलं आणि सर्वजण हादरले; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?