AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोन्याचे दर किंचित घसरले, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

Gold Rate Today | गेल्या आठ दिवसांत सोन्याचे भाव वधरले होते. आज सोन्याच्या किंमतीत किंचत घसरण दिसून आली. जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

Gold Silver Rate Today | सोन्याचे दर किंचित घसरले, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
सोन्याच्या दरात किंचित घसरण Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 02, 2022 | 12:27 PM
Share

Gold Silver Rate Today | आज, 2 ऑगस्ट 2022 रोजी भारतात सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचा कालचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,490 रुपये होता. त्यात 0.2 टक्क्यांनी घसरण झाली आणि आज सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली. डॉलर घसरल्याने आणि रोख्यातील उत्पन्न घसरल्यामुळे भारतीय सराफा बाजारावर परिणाम दिसत असला तरी आज सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. 1000 रुपयांच्या जवळपास भावात वाढ झाली होती. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) मंदीच्या (Recession) भीतीने पुन्हा एकदा व्याजदर (Interest Rate) वाढवले आहेत. त्याचा फारसा परिणाम बाजारावर अजून म्हणावा तसा दिसून आलेला नाही. आज सोन्या चांदीचे दर (Gold Silver Rate Today) काय आहेत ते पाहुयात.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,100 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,380 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 580 रुपये आहे. दोन दिवसांपूर्वी हा दर 584 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.  चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

दुसऱ्या सहामाहीत सोने वाढण्याची अपेक्षा

सोन्या-चांदीच्या दर वाढीबाबत आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 आधार अंकांची वाढ केली आहे. पण सप्टेंबर आणि त्यानंतर व्याजदरात तेवढी आक्रमक वाढ न करण्याचा दिलासा मध्यवर्ती बँकेने दिला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सलग दुसऱ्या तिमाहीत घसरली. त्यामुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी