AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर

Gold price | ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरून 48,000 रुपये प्रतितोळा इतका झाला. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.16 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,774 रुपये इतका आहे.

Gold price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर
सोने
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 09, 2021 | 10:17 AM
Share

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी चांदीचे भाव 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी घसरून 48,000 रुपये प्रतितोळा इतका झाला. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.16 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,774 रुपये इतका आहे.

रेकॉर्ड स्तरापासून 8200 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा सुमारे 8200 रुपयांनी स्वस्त आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर

तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई

घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?

आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली