AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan, processing fee : गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी गूड न्यूज, ‘या’ बँकेच्या व्याजदरांत घट; खरेदीची सुवर्णसंधी

विशिष्ट मुदतीसाठी ही सवलत कर्जदारांना उपलब्ध होणार आहे. नव्या नियमानुसार, बँक ऑफ बडौदाचे गृहकर्ज (HOME LOAN) आता 6.75 टक्क्यांऐवजी 6.50 टक्क्यांनी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना सुवर्णसंधी असल्याचे बँक ऑफ बडौदाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Loan, processing fee : गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी गूड न्यूज, ‘या’ बँकेच्या व्याजदरांत घट; खरेदीची सुवर्णसंधी
मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ!Image Credit source: twitter
| Updated on: Apr 23, 2022 | 11:30 PM
Share

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक ऑफ बडोदाने (BANK OF BARODA) गृह कर्जातील व्याज दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट मुदतीसाठी ही सवलत कर्जदारांना उपलब्ध होणार आहे. नव्या नियमानुसार, बँक ऑफ बडौदाचे गृहकर्ज (HOME LOAN) आता 6.75 टक्क्यांऐवजी 6.50 टक्क्यांनी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना सुवर्णसंधी असल्याचे बँक ऑफ बडौदाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कर्जदारांच्या क्रेडिट प्रोफाईल संबंधित ही योजना आहे. येत्या 30 जून 2022 पर्यंत ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. गेल्या काही महिन्यांत घराच्या विक्रीत (HOME BYUING) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. व्याज दरातील सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्यांची निकष सूची बँकेने जारी केली आहे.

सवलतीचे निकष

गृह कर्ज आणि बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना ग्राहकांसाठीच ही मुभा असणार आहे. तसेच सवलतीचा लाभ घेण्यासाठी सिबिल स्कोअरच बंधन मात्र असणार आहे. बँकेने एक एप्रिल 2022 पासून व्याजदरात वाढीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा फेररचना करण्याचे ठरवलं आहे.

एमएलसीआर वाढ

बँक ऑफ बडौदाने एमसीएलआर दरांत वाढ केली होती. बँकेने 12 एप्रिल 2022 पासून एमसीएलआर मध्ये 0.05 टक्के वाढीचा निर्णय घेतला होता. यासोबतच एक वर्षाच्या कालावधीसाठी एमएलसीआर 7.35 टक्क्यांवर पोहोचला होता. नव्याने कर्ज घेणाऱ्यांसाठी किंवा सध्याच्या कर्जदारांवर एमसीएलआर मधील वाढीचा परिणाम होतो.

व्याजदरासोबत ‘हे’ महत्वाचे

अर्जदारांनी गृह कर्ज घेताना व्याज दरा व्यतिरिक्त अन्य बाबींकडे लक्ष द्यायला हवं. अन्य शुल्क कर्ज रकमेवर मोठा परिणाम करतात. त्यामुळे कर्जदाराला पुरेशी माहिती नसल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

  1. अर्ज शुल्क- कर्ज प्रकरणाची प्रारंभिक पडताळणी करण्यासाठी सर्व बँका किंवा किंवा कर्ज आस्थापनांकडून शुल्क आकारले जाते.
  2. प्रक्रिया शुल्क – कर्जदाराची क्रेडिट प्रोफाइल, उत्पन्न आणि गृह कर्ज योजनेवर आधारित प्रक्रिया शुल्क ठरते. बँक किंवा वित्तीय आस्थापनांच्या निहाय प्रक्रिया शुल्क भिन्न असते.
  3. फोरक्लोजर शुल्क- विहित कालावधीपूर्वी गृह कर्ज भरल्यानंतर बँक किंवा वित्तीय आस्थापने फोरक्लोजर शुल्क आकारतात.

इतर बातम्या

Special Report | 5 विरोधकांचा मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना चौफेर घेराव

Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध

Special Report | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.