PPF Interest Rate | पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, सरकार लवकरच करणार ही घोषणा

| Updated on: Sep 02, 2022 | 3:52 PM

PPF Interest Rate | आरबीआयने तीन वेळा रेपो रेटमध्ये 1.40 टक्के वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने पुन्हा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढीचे संकेत मिळत आहेत.

PPF Interest Rate | पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, सरकार लवकरच करणार ही घोषणा
व्याजदर वाढू शकतात
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

PPF Interest Rate | जर तुम्ही पीपीएफ(PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana),  किसान विकास पत्र या अल्प बचत योजनांमध्येही गुंतवणूक करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच. आरबीआयने तीन वेळा रेपो रेटमध्ये 1.40 टक्के वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने पुन्हा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढीचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सप्टेंबरमध्ये सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफच्या व्याजदरात बदल करण्याच्या तयारीत आहे. याचा थेट फायदा अल्पबचत योजनांमध्ये Small Savings Scheme) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना होणार आहे. सरकारने केलेल्या बदलांची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.

रेपो रेटमध्ये 1.40 टक्क्यांची वाढ

सध्या महागाईने (Inflation) नवे नवे रेकॉर्ड सुरु ठेवले आहे. आरबीआयने तीन वेळा रेपो रेटमध्ये 1.40 टक्के वाढ केली आहे. बँकांच्या व्याजदरात वाढ होत आहे. अनेक बँकांनी बचत खाते, मुदत ठेव, आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदर वाढवले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारी बचत योजनांना पूर्वीपेक्षा अधिक व्याज मिळणे अपेक्षित आहे. सरकारने केलेल्या बदलांची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.

30 सप्टेंबरला व्याजदरांचा आढावा

30 सप्टेंबर रोजी अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेतला जाईल. हा आढावा ऑक्टोबर ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सरकारने यावेळी बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करणे अपेक्षित आहे. अल्पबचत योजनांवरील व्याजदरात (Small Savings Scheme) अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

व्याजदर का बदलणार?

बँक आणि आरबीआयने सरकारच्या अल्पबचत योजनांवरील व्याज वाढवण्यास अनुकूलता दाखवली आहे. आरबीआयने मे महिन्यापासून तीन वेळा रेपो रेट वाढवला आहे. सध्या रेपो दर 5.4 टक्के इतका आहे. येत्या काळात त्यात आणखी 25 बेसिक पॉइंट्स वाढ होण्याची शक्यता आहे. पण सरकारकडून बचत योजनांबाबत कोणताही बदल करण्यात आला नाही. हा बदल लवकरच होण्याची आशा आहे. अशा परिस्थितीत पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील परतावाही वाढण्याची दाट शक्यता आहे.

तीन महिन्याला व्याजदरात बदल

अल्पबचत योजनांवरील व्याजाचा दर तीन महिन्यांनी सरकारकडून आढावा घेतला जातो. हा आढावा घेताना व्याजदरात वाढ, घट अथवा दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. हे व्याजदर अर्थमंत्रालयाकडून(Finance Ministry) निश्चित केले जातात.

बचतीवर किती व्याज मिळते?

सध्या पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 7.6 टक्के व्याज देण्यात येते. राष्ट्रीय बचत आवर्ती खात्यावर 5.8 टक्के तर किसान विकास पत्रावर 6.9 टक्के व्याज देण्यात येते.