रेल्वेचे Confirm तिकीट बुक करण्यासाठी वापरा ही पद्धत

IRCTC Online Booking | आरआरसीटीसीने एक सुविधा दिली आहे. तिचा वापर केल्यावर तुमचे तिकीट कन्फार्म असेल तरच पैसे कापले जाणार आहे. अन्यथा तुमचे पैसे कापले जाणार नाही. यामुळे पैसे परत येण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

रेल्वेचे Confirm तिकीट बुक करण्यासाठी वापरा ही पद्धत
26 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज हा करावा.
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 7:11 AM

मुंबई, दि. 21 फेब्रुवारी 2024 | भारतीय रेल्वेमधून रोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेचे आरक्षण करणे सोपे झाले आहे. परंतु आरक्षित (कन्फार्म तिकीट) तिकीट मिळणे अवघड झाले आहे. लांब पल्लांच्या ट्रेनमध्ये तीन, तीन महिन्यांपूर्वी तिकीट आरक्षित होते. तत्काल तिकीट काही मिनिटांमध्ये संपतात. यामुळे अनेक प्रवाशांना वेटींग तिकीट मिळते. अनेकदा वेटींग तिकीट कन्फार्म होत नाही. त्यानंतर ते तिकीट अ‍ॅटोमॅटीक रद्द होते आणि ते पैसे जमा होण्यासाठी आठवडाभरचा कालावधी लागतो. तत्काल तिकीट करताना ही सर्वात मोठी अडचण असते. परंतु आरआरसीटीसीने एक सुविधा दिली आहे. तिचा वापर केल्यावर तुमचे तिकीट कन्फार्म असेल तरच पैसे कापले जाणार आहे. अन्यथा तुमचे पैसे कापले जाणार नाही. तिकीट बुक करण्याचा या प्रक्रियाला Auto Pay नाव दिले  आहे.

पेमेंट गेटवे मध्ये ही सुविधा

IRCTC ने iPay पेमेंट गेटवे मध्ये ही सुविधा दिली आहे. या पर्यायाचा वापर केल्यास तिकीट कन्‍फर्म असेल तरच पैसे कापले जाईल. iPay पेमेंट गेटवेचा ‘ऑटो पे’ फिचर युपीआय, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डसोबत काम करतो. IRCTC iPay सर्वांसाठी फायदेशीर आहे. यामुळे वेटींग तिकीट काढून तुम्हाला रिफंडसाठी वाट पाहावी लागत नाही.

IRCTC वर ‘iPay’ फिचर असे वापरा

  • स्टेप 1: आयआरसीटीसी वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर जा. तुमचे प्रवाशाचे सर्व डिटेल्स भरा.
  • स्टेप 2: सेलेक्‍ट केलेल्या बर्थ ऑप्शन पेमेंटसाठी पर्याय निवडा.
  • स्टेप 3: पेमेंट गेटवेचे अनेक पर्याय असतील. त्यातील एक ‘iPay’ असणार आहे. त्यावर क्लिक करा
  • स्टेप 4: क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल. त्यावर पेमेंटचे अनेक ऑप्शन असतील. ऑटोपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आयआरसीटीसी कॅश आणि नेट बँकिंगचा पर्याय आहे.
  • स्टेप 5: ऑटोपे पर्यायाची निवड करा. त्यात आणखी 3 पर्याय मिळतील. युपीआय, क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड. त्यातील एक पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करा.
  • स्टेप 6: तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळत असेल तरच पैसे कापले जाणार आहे.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी.
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला.
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी.
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार.
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?.