कसं बनलं ‘जन-गण-मन’ भारताचं राष्ट्रगीत, काय आहे राष्ट्रगीताचा इतिहास? वाचा,

रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहीली होती. या कवितेचं पहिलं पद म्हणजे भारताचं राष्ट्रगीत. टागोर यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. ज्यात संस्कृत शब्दांचाही वापर करण्यात आला होता. 'जन-गण-मन' हे पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायलं गेलं

कसं बनलं 'जन-गण-मन' भारताचं राष्ट्रगीत, काय आहे राष्ट्रगीताचा इतिहास? वाचा,
राष्ट्रगीत
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 6:48 PM

नवी दिल्ली : राष्ट्रगीत म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या राष्ट्रप्रेमाचं प्रतीक (Indian National Anthem). 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि यासोबतच इतर अनेक प्रसंगांना राष्ट्रगीत गायलं जातं. अनेक कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने होते. पण राष्ट्रगीत गायनाचे काही मूलभूत नियम आहेत जे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतील. एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत गायलं जाणार असेल तर त्याचा योग्य सन्मान होणं गरजेचं आहे. (How did ‘Jana-Gana-Man’ become the national anthem of India and what is the history of the national anthem?)

स्वर्गीय रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी भारताचं राष्ट्रगीत जन-गण-मन लिहिलं हे आपल्याला माहित आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रगीताच्या पहिल्या आणि शेवटच्या ओळीही गायल्या जातात. हे राष्ट्रगीताचं संक्षिप्त रुप आहे.

जन-गण-मन-अधिनायक जय हे भारत-भाग्‍य-विधाता जय हे, जय हे, जय हे जय जय जय जय हे

24 जानेवारी 1950 ला ‘जन-गण-मन’ बनलं राष्ट्रगीत

रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहीली होती. या कवितेचं पहिलं पद म्हणजे भारताचं राष्ट्रगीत. टागोर यांनी ही कविता बंगाली (Bengali) भाषेत लिहिली होती. ज्यात संस्कृत शब्दांचाही वापर करण्यात आला होता. ‘जन-गण-मन’ हे पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायलं गेलं. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला रवींद्रनाथ टागोर यांच्या या कवितेला अधिकृतरित्या भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं. राष्ट्रगीताचे बोल आणि संगीत टागोरांनी आंध्र प्रदेशच्या मदनापल्लीमध्ये (Mdanapalli) तयार केली होती.

52 सेकंदांत गायलं जातं राष्ट्रगीत

संपूर्ण राष्ट्रगीत गायनासाठी 52 सेकंदांचा वेळ लागतो. पहिलं आणि शेवटचं कडवं असलेलं राष्ट्रगीताचं संक्षिप्त रुप गायनासाठी 20 सेकंदांचा वेळ लागतो. राष्ट्रगीत म्हणताना काही नियमाचं पालन करणं बंधनकारक आहे. जर कुणी या नियमांचं उल्लंघन करतं तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. यामध्ये एक नियम असाही आहे की, सिनेमा थिएटरमध्ये जेव्हा राष्ट्रगीत सुरू होईल तेव्हा उपस्थितांनी जागेवर उभं राहून राष्ट्रगीताचा मान राखणं अपेक्षित आहे.

संयुक्त राष्ट्र संघात घुमला ‘जन-गण-मन’चा आवाज

देश स्वातंत्र्य होत असताना 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पहिल्यांदा संविधान सभेची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला ‘जन-गण-मन’ गायलं गेलं. 1947 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations) भारतीय प्रतिनिधी मंडळाला भारताच्या राष्ट्रगीताबाबत माहिती मागितली गेली. तेव्हा भारतीय मंडळाने ‘जन-गण-मन’ची रेकॉर्डिंग संयुक्त राष्ट्र संघाला दिली. त्यादिवशी संपूर्ण जगभरातून आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताचं राष्ट्रगीत अभिमानाने वाजवलं गेलं. त्यावेळी सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. या घटनेच्या तीन वर्षांनंतर 24 जानेवारी 1950 ला भारताच्या संविधानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. या दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांनी अधिकृतरित्या ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगाण घोषित केलं.

राष्‍ट्रगीत

जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्‍य विधाता पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा द्राविड़-उत्‍कल-बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्‍छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मांगे गाहे तव जय-गाथा जन-गण-मंगलदायक जय हे भारत भाग्‍य विधाता जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे

सरकारची विशेष तयारी

यंदा 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे (74 Years of Indian Independence) पूर्ण होत आहेत तर देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देश पदार्पण करत आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून यावर्षी राष्ट्रगीतासंबंधी एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना आपलं गायलेलं राष्ट्रगीत देशभर पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं www.rashtragan.in ही वेबसाईट सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही गायलेल्या राष्ट्रगीताचा व्हिडीओ अपलोड करू शकता. देशबरातून आलेल्या राष्ट्रगीतांच्या व्हिडीओचं हे संकलन 15 ऑगस्ट रोजी लाईव्ह दाखवलं जाणार आहे. (How did ‘Jana-Gana-Man’ become the national anthem of India and what is the history of the national anthem?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 25 जुलैला मन की बात या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाची घोषणा केली होती. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, सांस्कृतिक मंत्रालयाचा हा प्रयत्न आहे की, अधिकाधिक संख्येनं भारतीयांनी एकत्रित राष्ट्रगीय गायला हवं. त्यासाठी एक वेबसाईटही बनवण्यात आली आहे. www.rashtragan.in या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही तुमचं राष्ट्रगीत प्रस्तुत करू शकता आणि रेकॉर्ड करून या उपक्रमात सहभागी होऊ शकता. मला अपेक्षा आहे की, अधिकाधिक भारतीय या उपक्रमाशी जोडले जातील”, असं पंतप्रधान मोदी आपल्या संवादात म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येकाच्या नसानसात राष्ट्रगीत भिनणार, सांस्कृतिक मंत्र्यांकडून विशेष मोहिम घोषित

आता इकडे-तिकडे भटकणे सोडा, PM मोदींकडून उज्ज्वला 2.0 योजना लाँच

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.