Insurance In Rainy Season | पावसाळ्यात मोटार विमा किती महत्वाचा? गाडी बंद पडण्यापूर्वी करा हे काम!

| Updated on: Aug 10, 2022 | 6:24 AM

Insurance In Rainy Season | पावसाळ्यात मोटार विमा किती महत्वाचा आहे हे गाडी बंद पडल्यावर कळते, पावसाळ्यात मोटार विम्याचा कसा फायदा होतो ते जाणून घेऊयात.

Insurance In Rainy Season | पावसाळ्यात मोटार विमा किती महत्वाचा? गाडी बंद पडण्यापूर्वी करा हे काम!
मोटार विम्याची आवश्यकता
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Insurance In Rainy Season | पावसाळाच (Rainy Season) काय पण कोणत्याही ऋतूत तुमच्याकडे वाहन विमा (Motor Insurance) असणे कधी ही फायदेशीर ठरते. त्यामुळे अचानक काही दुर्घटना घडली अथवा नाहकचा खर्च वाढला तर तुम्हाला विम्याच्या संरक्षणातून नुकसान भरपाई (Compensation) मिळविता येते आणि त्याचा फायदा तुमच्या बचतीवर होत नाही. मोटार विम्याचा मुख्य उद्देश मानवी असो वा नैसर्गिक, कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून आपल्या वाहनाचे संरक्षण करणे हा असतो. पाऊस हा असा ऋतू आहे ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. पण पाऊस आपल्याबरोबर केवळ आल्हाददायक वातावरणच आणत नाही तर काही समस्या ही घेऊन येतो. देशातील रस्त्यांची दुरावस्था पाहुन तर तुम्हाला वाहनाच्या विम्याची किती गरज आहे हे एव्हाना कळलंच असेल. एवढेच नाही तर अनेक पुलावरुन मार्ग काढताना अनेकदा अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात वाहने आणि माणसे वाहुन गेल्याच्या कितीतरी घटना आता आपण पाहिल्याच आहे. त्यामुळे Policybazaar.com च्यामते कोणत्याही परिस्थितीत मोटार विम्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

योग्य विमा निवडा

पावसाळ्यात कोणतंही वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याची गरज असते. कारण पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना शेवटी तुमच्या वाहनाला ही सामोरं जावं लागतं. Policybazaar.com च्या मोटार विमा नूतनीकरणाच्या प्रमुख अश्विनी दुबे यंच्या मते, पावसाळ्यात सुखद प्रवासासाठी तुम्हाला योग्य मोटार विमा संरक्षण मिळेल याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. विमा घेताना वाहनधारकाने वाहनाचे संरक्षण करण्यासाठी अॅड-ऑन कव्हर्स जोडण्यास विसरू नये. मोटार इन्शुरन्समध्ये खरेदी करण्याबरोबरच अॅड-ऑन सुविधा ही खरेदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला मोठा अपघातच नाही तर गाडीच्या किरकोळ आणि महत्वाच्या कामासाठी खिश्यातून मोठा खर्च करण्याची गरज भासत नाही. अॅड ऑन सेवेमुळे हा खर्च एकदम वाचतो.

हे सुद्धा वाचा

याचा ही विचार करा

कोणत्याही वाहनाला अशा विम्याची गरज असते, जी केवळ अपघातांसाठीच संरक्षण देत नाही, तर नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग यांसारख्या धोक्यांपासून आपल्या वाहनाचे संरक्षण करते. विशेषत: पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक बळावते, त्यामुळे सर्वंकष धोरण निवडून मोटार विमा खरेदी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हे पाणी जर तुमच्या वाहनाच्या इंजिनात गेले तर वाहनाचे इंजिन जाम अथवा खराब होण्याची समस्या उद्धभवते. सर्वसामान्य विमा पॉलिसीत इंजिनासंबंधीच्या सेवांचा समावेश नसतो. अशावेळी वाहनधारकांना अॅड ऑन फीचर सर्वात योग्य पर्याय आहे.

खराब झालेल्या भागांसाठी विमा संरक्षण

पावसात वाहनांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते आणि अशा परिस्थितीत तुम्ही अॅड ऑन सेवांचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला छोट्या मोठ्या नुकसानीसाठी खिश्यातून मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. हे अॅड ऑन कव्हर फक्त पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी जुन्या गाड्यांसाठीच उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. अनेक अॅड ऑन कव्हर सध्या पॉलिसीसोबत उपलब्ध आहबेत. त्याच्या मदतीने तुम्ही नुकसान टाळू शकता. एवढेच नाहीतर काही अॅड ऑन तुम्हाला गाडी अचानक रस्त्यात बंद पडली तर पिकअप सेवा ही देतात. त्यामुळे तुम्हाला होणारा मनस्ताप तर वाचतोच पण वेळीच गाडीला दुरुस्ती करता येत असल्यामुळे वेळेची बचत तर होतेच पण अधिकचा खर्च ही वाचतो.