AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rs 5 Old Note : छंदासाठी काहीपण, पाच रुपयांच्या ‘या’ नोटेसाठी शौकिनाची लाखाची बोली; तुमच्याकडे आहे का?

तुमच्याकडे पाच रुपयांची चलनी कागदी नोट (Paper notes) असल्यास तुम्ही घरबसल्या एक लाख रुपयांची कमाई निश्चितपणे करू शकतात.

Rs 5 Old Note : छंदासाठी काहीपण, पाच रुपयांच्या ‘या’ नोटेसाठी शौकिनाची लाखाची बोली; तुमच्याकडे आहे का?
पाच रुपयांच्या ‘या’ नोटेसाठी शौकिनाची लाखाची बोलीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 7:04 PM
Share

नवी दिल्ली : तुम्हाला पाच रुपयांची नोट लखपती बनवू शकते? वाचून आश्चर्च वाटलं ना! तुम्हाला विश्वास बसणार नाही. बातमी शंभर टक्के खरी आहे. जुन्या नोटा व चलनी नाण्यांच्या लिलावातून (Currency and coin) मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. भारतात विशिष्ट नोटा व नाण्यांचा संग्रह करणारे अनेक शौकिन आहेत. नाणी व नोटांचे संग्राहक आपल्या छंदासाठी लाखो रुपये मोजण्यास तयार असतात. सध्या चलनात नसलेल्या किंवा तुलनेने कमी वापराच्या चलनाच्या खरेदीसाठी चढाओढ सुरू असते. तुमच्याकडे पाच रुपयांची चलनी कागदी नोट (Paper notes) असल्यास तुम्ही घरबसल्या एक लाख रुपयांची कमाई निश्चितपणे करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाच रुपयांत लखपती होण्याचा (How to become lakhpati) मार्ग पॉईंट-टू-पॉईंट

छंदासाठी काहीपण

चलनी नोटा व नाण्यांच्या खरेदी-विक्रीत बडे उद्योगपती सरसावले आहेत. सध्या इंटरनेटवर ऑनलाईन खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मची मोठी चलती आहे. या प्लॅटफॉर्मवरुन विशिष्ट नाणी किंवा नोटेसाठी पसंती दर्शविली जाते आणि उपलब्ध व्यक्तींकडून खरेदीसाठी बोलीची प्रक्रिया सुरू होते. तुमच्या असलेल्या चलनाचा फोटो ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करावा लागतो आणि तुमच्याविषयी अधिकृत सर्व माहिती सादर करावी लागते. रुपयांपासून सुरू होणारी बोली लाखांपर्यंत जाऊन पोहोचते.

शोध ‘या’ नोटेचा

सध्या पाच रुपयांच्या नोटेचा जोरदार शोध सुरू आहे. मात्र, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीत नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचं चित्र नोटेवर असणं महत्वाचं आहे. तुमच्याकडे अशाप्रकारची नोट असल्यास तुम्ही निश्चित बोली प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.

कशी कराल नोंदणी

coinbazaar.com या वेबसाईटच्या माध्यमातून जुनी पदक, चलने तसेच नोटांच्या खरेदी-विक्रीचे काम केले जाते. तुम्हाला वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडील दुर्मिळ चलनी नाणी किंवा नोटांचे फोटो अपलोड करावे लागतील. तुम्हाला अपेक्षित किंमत व आवश्यक अन्य तपशील भरल्यानंतर खरेदी करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनी तुमच्याशी संपर्क साधतील.

ओएलएक्स नोटा व चलनांची विक्री

⦁ OLX.in वर जा

⦁ विक्रेता म्हणून नोंदणी करण्याद्वारे डाव्या बाजूला “विक्री करा” वर क्लिक करा

⦁ तुमचा मोबाईल नंबर एन्टर करा किंवा गूगल वर साईन-इन करा

⦁ नाण्यांची नोंदणी करण्यासाठी सुस्पष्ट फोटो घ्या आणि आवश्यक अतिरिक्त तपशील भरा

⦁ खरेदी करणाऱ्या व्यक्ती OLX च्या माध्यमातून किंवा फोन द्वारे तुमच्याशी संपर्क साधतील.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.