
बँकिंग क्षेत्रातील घडामोडी पाहता अनेक सुरक्षित ठेवी ठेवण्याच्या शोधात आहेत. त्यामुळे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीला सर्वाधिक प्राधान्य दिलं जात आहे. कारण यात गुंतवलेले पैसे बुडणार नाही, याची खात्री असते. त्यामुळे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. योग्य योजनेत पैशांची गुंतवणूक केली तर भविष्यात एक मोठी रक्कम हाती पडू शकते. पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट योजना या आधारवर आहे. यात प्रत्येक महिन्यात थोडी थोडकी रक्कम जमा केल्यानंतर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला मुलांचं शिक्षण, निवृत्तिनंतरचा खर्च किंवा वैद्यकीय गरजेवेळी पैशांचा विनियोग करू शकता. ही योजना कर्मचारी, छोटे व्यापारी आणि रोजंदारीवर काम करण्याऱ्यांसाठी उत्तम आहे. खासकरून मुलांचं शिक्षण, लग्न आणि घर बांधण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना ही बचत योजना आहे. यात प्रत्येक महिन्याला ठरवलेली रक्कम गुंतवू शकता. यात व्याजासह रक्कम हळूहळू वाढते. मुदत संपल्यानंतर यातून तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. पोस्ट ऑफिस सरकारच्या आखत्यारित येते. त्यामुळे यात जोखिम खूपच कमी आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक सुरक्षित ठरू शकते. जर तुम्ही पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयेजमा केले तर या योजनेत 6 लाख रुपये जमा होती. व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 7 लाख 13 हजार 659 रुपये मिळतील. म्हणजेच तु्म्हाला 1,13,659 रुपये इतका व्याज मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येक तीन महिन्याने व्याजदर चक्रवाढ होते.
जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीत आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहे. कदाचित यात वाढ देखील होऊ शकते. कारण सरकार दर तीन महिन्यांनी या दराचा आढावा घेऊन अपडेट करते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुढे वाढवू शकता. दुसरीकडे, आरडी खात्यात तुम्ही एका वर्षात 12 हप्ते पूर्ण केले तर तुम्हाला जमा राशीच्या जवळपास 50 टक्के कर्ज मिळू शकते. त्यामुळे गरजेवेळी मदत होऊ शकते. पण कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक असतो.
(डिस्क्लेमर : हा लेख फक्त माहितीसाठी आहे. या माध्यमातून आम्ही गुंतवणुकीचा कोणताही सल्ला देत नाही. गुंतवणुकीसाठी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करा.)