AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cash Reserve Ratio : आरबीआयच्या दरवाढ म्युच्युअल फंडाच्या पथ्यावर; फंडनुसार कही खुशी कही गम

बँकिंग नियामकाने कॅश रिझर्व्ह रेशो देखील 50 बेसिस पॉईंट्सने वाढविला आहे. या सर्व घडामोडी म्युच्युअल फंडाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

Cash Reserve Ratio : आरबीआयच्या दरवाढ म्युच्युअल फंडाच्या पथ्यावर; फंडनुसार कही खुशी कही गम
रिझर्व्ह बँकImage Credit source: social
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 2:40 PM
Share

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेट मध्ये 40-बेसिस पॉईंट्स वाढ केली आहे. बँकिंग नियामकाने कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio) देखील 50 बेसिस पॉईंट्सने वाढविला आहे. या दरवाढीमुळे बहुतेक गुंतवणूकदारांना आश्चर्य वाटले नसेल, परंतु दरवाढीची ही वेळ आणि दरवाढीचे प्रमाण पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. बाजारातील बऱ्याच सहभागीदारांचा असा विश्वास आहे की महागाईला (inflation) लगाम घालण्यासाठी आरबीआय धडपड करत आहे. त्यासाठीच थोडा आव्हानात्मक मार्ग निवडत आरबीआयने रेपो दरात वाढीचा मार्ग जोखला. गेल्या काही वर्षांपासून परंपरागत मार्गाला फाटा देत गुंतवणुकदारांनी थोडा जोखमीचा परंतु अधिक परताव्याचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मार्ग निवडला आहे. कोरोना काळात या पर्यायात अनेक पटींनी वाढ झाली. तर, केंद्रीय बॅंकेचा निर्णय, महागाई, वाहन कर्ज, गृह कर्ज वाढ या सर्व घडामोडींचा म्युच्युअल फंड गुंतवणूकीवर (Mutual fund Investments) काय परिणाम होईल ते बघुयात.

सीआरआरमध्ये वाढ

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आरबीआयने काल केलेल्या कृती समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीच आहे की, आरबीआय आपल्या धोरणात्मक दरांचा वापर अर्थव्यवस्थेतील दराच्या हालचालीचे संकेत देण्यासाठी करते. तर, कालच्या 40 BPS (100 BPS = 1%) दरवाढीचा अर्थ असा आहे की व्याज दर (interest rates) अजून वर जाण्याची शक्यता आहे, आरबीआयने सीआरआरमध्ये (CRR) देखील अर्धा टक्का वाढ केली आहे. सीआरआर ही ठेवींची टक्केवारी आहे जी बँकांना आरबीआयकडे ठेवणे बंधनकारक आहे. त्यावर बँकांना कोणतेही व्याज मिळत नाही.

व्याजदर वाढण्याची शक्यता

तर मग, या दोन गोष्टींचा अर्थ काय आहे? एक, कर्ज घेणार असाल तर अधिक दराने रक्कम परतफेडीची तयारी ठेवा. आरबीआय स्पष्टपणे सांगत आहे की, धोरणात्मक दर (Policy Rate) वाढवून व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. दुसरी बाब म्हणजे, CRR वाढवून ते बँकिंग प्रणालीतील अतिरिक्त तरलता सहज पैसा मिळण्याची शक्यता गोठावत आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की, आता बॅंकांकडून सहजरीत्या अगदी कमी व्याजदरात कर्ज मिळण्याचे दिवस संपुष्टात आले आहेत. निश्चितच, आपल्याकडे शून्य अथवा जवळपास शून्य व्याजदर उपलब्ध नव्हता.

गुंतवणुकीवर काय परिणाम होतो?

चला तर या घडामोडींचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर काय परिणाम होतो हे पाहुयात. इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे जाऊयात. आधी म्हटल्याप्रमाणे कर्जे महागणार आहेत. ज्या कंपन्यांनी भरपूर उधारी केली आहे, भरमसाठ कर्जे घेतली आहेत आता त्यांच्यावर दबाव आला आहे, कारण आता या कर्जासाठी त्यांना अधिकचे व्याज मोजावे लागले. त्यापैकी काहींना कर्ज मिळण्यासाठी ही अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत खूप मोठ्या कंपन्या ज्यांच्यावर खूप कमी कर्ज आहे, अशा कंपन्या चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की आपले लार्ज कॅप म्युच्युअल फंड (large cap mutual funds) नजीकच्या काळात अधिक चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.

जर तुमची स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक असेल तर

स्मॉल कॅप फंडात केलेली गुंतवणूक तुम्हाला थोडी अडचणीत आणण्याची चिन्हे आहेत. या योजनेत अस्थिरता आणि नुकसानीची शक्यता आहे. तुमची मिड कॅप योजना ही या भयावह स्थितीत भरडून निघू शकते. दूर्दैवाने नुकसानीचा हा फेरा किड्यांसह गव्हाला ही रगडणार असल्याने या फंडातील तुमच्या गुंतवणुकीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अडचणींच्या काळात कंपन्यांना त्यांचे कॉपोर्रेट पातळीवरील मुद्दे पण जेरीस आणत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

तसेच, या वर्षी इक्विटी फंडाकडून आपल्या परताव्याच्या अपेक्षा कमी ठेवा. अशा परिस्थितीत सकारात्मक परताव्यासाठी खूप आनंदी राहा. तसेच, तुमचा म्युच्युअल फंड धोकादायक स्थितीत असल्याने घाबरू नका. तुमची नियमित गुंतवणूक सुरू ठेवा. सट्टा किंवा आक्रमक गुंतवणुकीला आळा घालण्याची हीच योग्य वेळ आहे.

आता डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे वळूयात. वाढते व्याजदर ही डेट म्युच्युअल फंडांसाठी, विशेषत: दीर्घकालीन डेट फंड आणि सरकारी रोखे फंडांसाठी वाईट बातमी आहे. दर वाढले की रोख्यांच्या किंमती घसरतात. याचे कारण असे की बहुतेक गुंतवणूकदार कर्जासाठी अधिक पैसे देणाऱ्या नवीन रोख्यांची प्रतीक्षा करतात. त्यामुळे सध्या शॉर्ट टर्म डेट फंडांना प्राधान्य द्या.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.