AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICICI Bank ग्राहकांना खुशखबर, बँकेने तिस-यांदा वाढवला व्याजदर, मुदत ठेवीवर होणार कमाई

ICICI बँकेने 21 एप्रिल रोजी व्याद दरात वाढ केली होती. यावेळी ही बँकेने मुदत ठेवीवरील व्याजात 0.05 ते 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे

ICICI Bank ग्राहकांना खुशखबर, बँकेने तिस-यांदा वाढवला व्याजदर, मुदत ठेवीवर होणार कमाई
Image Credit source: facebook
| Updated on: Apr 29, 2022 | 9:42 AM
Share

मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) पुन्हा एकदा कोट्यवधी ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात (FD Interest Rates) वाढ केली आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आणि पाच कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळा नुसार, आयसीआयसीआय बँकेने अनेक मुदतीवरील व्याजदरात 5 ते 10 बेसिस पॉईंट्सची (Basis Points) वाढ केली आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक 1 वर्ष आणि 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.30 टक्के व्याज देत होती, ती 4.35 टक्के करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुदत ठेवींच्या व्याजदरात 5 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. नवे दर 29 एप्रिल 2022 रोजी पासून लागू झाले आहेत. यापूर्वी बँकेने 21 एप्रिल रोजी व्याजदरात वाढ केली होती.

मुदत ठेवीवरील परतावा हा नेहमी दोन गोष्टींवर अवलंबून असतो. तुम्ही जमा करत असलेली रक्कम आणि किती कालावधीसाठी तुम्ही मुदत ठेव ठेवतात, तो कालावधी. याचा अर्थ किती रक्कम किती महिने अथवा किती वर्षांकरीता जमा करण्यात येत आहे, त्याआधारे ग्राहकाला परतावा मिळतो. कधी फायदा होतो तर कधी कमी परतावा मिळतो. बँक त्यांच्या धोरणानुसार जमा केलेल्या रक्कमेवर व्याज दरांची घोषणा करते. त्यामुळे कोणत्याही बँकेत गुंतवणूक करताना त्याची तुलना करा, म्हणजे तुम्हाला फायदा मिळेल.

नवीन व्याज दर

बँक ग्राहकांना एक वर्ष ते 389 दिवसांकरीता मुदत ठेवीवर आता 4.35 टक्के व्याज देते, पुर्वी बँक या कालावधीसाठी 4.30 टक्के व्याज देत होती. 390 दिवस ते 15 महिन्यांच्या मुदत ठेवीवर बँक 4.35 टक्के व्याज देणार आहे. पूर्वी या कालावधीसाठी बँक 4.30 टक्के व्याज देईल. याशिवाय 15 महिने ते 18 महिन्यांच्या एफडीसाठी बँक आता 4.45 टक्के व्याज देणार आहे.पूर्वी या कालावधीसाठी 4.40 टक्के व्याज देईल. बँकेने सर्व मुदत ठेवींसाठी व्याजदरात 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे.

या मुदत ठेवीवर मिळणार 0.10 टक्क्यांचा फायदा

18 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीच्या मुदत ठेवीवर आता 4.50 टक्क्यांऐवजी 4.60 टक्के व्याज मिळेल. तर 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंत्या मुदत ठेवींवर 4.60 टक्क्यांऐवजी 4.70 टक्के व्याज मिळेल. याशिवाय 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष आणि 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष कालावधी पूर्ण होणा-या मुदत ठेवींवर 4.7 टक्के व्याज मिळणार आहे. आता व्याजदरात वाढ होऊन ते 4.80 टक्के होणार आहे. बँकेने या सर्व मुदत ठेवींच्या व्याजदरात 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. याशिवाय इतर कोणत्याही कालावधीसाठीच्या मुदत ठेवीमध्ये बँकेने कसलाही बदल केलेला नाही.

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.