ट्रेन चुकली तर रेल्वे देते ही सुविधा, या गोष्टीची माहिती आहे का आपल्याला ?

भारतीय रेल्वेने प्रवाशांना अनेक सुविधा दिल्या आहेत. आगाऊ तिकीट काढूनही जर रेल्वे चुकली तर प्रवाशांचे नुकसान टाळण्यासाठी रेल्वेने एक सुविधा दिली आहे.

ट्रेन चुकली तर रेल्वे देते ही सुविधा, या गोष्टीची माहिती आहे का आपल्याला ?
indian railway
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 22, 2024 | 4:43 PM

Indian Railway : भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा आहे. देशात दररोज अडीच कोटी नागरिक रेल्वेतून प्रवास करीत असतात. ही संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येहूनही अधिक आहे. रेल्वेतून प्रवास करताना अनेक सुविधांची आपल्याला कल्पना नसते. ट्रेनमधून प्रवास करताना तिकीटांविषयीचे अनेक नियम बरेचदा सर्वसामान्य प्रवाशांना नीटसे माहिती नसतात. लांबपल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात.

रेल्वेतून अनेक आगाऊ रिझर्व्हेशन करुनच प्रवास करीत असतात. कारण आपल्याला आरामदायकरित्या खात्रीशीरपणे प्रवास करायला मिळतो. परंतू अनेकदा आपली ट्रेन चुकते. परंतू अशावेळी नेमके करायचे काय ? हे मात्र अनेकदा अनेकांना माहीती नसते. त्यामुळे अनेकदा ट्रेन मिस झाली तर तिकीटांचे पैसे वाया जातात. कारण एकदा का चार्ट तयार झाला की तिकीटाला रद्द करता येत नाही. परंतू भारतीय रेल्वे अशी सुविधा देते त्यातून तुम्हाला कमी नुकसान होते. चला तर पाहूयात काय ही सुविधा…

टीडीआर फाईल करा

जर तुम्ही भारतीय रेल्वेतून प्रवास करीत आहात आणि प्रवासाची ट्रेन तिकीट बुक केली असेल आणि ट्रेन चुकली तरी चिंता नको. आपण टीडीआरच्या माध्यमातून नुकसान टाळू शकता. त्यामुळे तुम्हाला लागलीच रिफंड मिळेल. जर तुम्ही ऑफ लाईन तिकीट बुक केली आहे. तर रेल्वे तिकीट काऊंटरवर जाऊन टीडीआर ( Ticket Deposit Receipt ) फाईल करु शकता. परंतू जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केली आहे. तर तुम्हाला ऑनलाईन आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर किंवा ऐपवर जाऊन लॉग इन करावा लागेल. ऐपच्या माध्यमातून टीडीआर फाईल करण्यासाठी ऐपमध्ये लॉगिन करावे लागेल. त्यानंतर ट्रेनच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला टीडीआरचे ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला टीडीआर फाईल करण्यासाठी अव्हेलेबल तिकीट्सचे ऑप्शन मिळेल ज्यावर तु्म्ही टीडीआर फाईल करु शकतो. त्यानंतर टीडीआर फाईल करण्यासाठी दिलेल्या कारणांपैकी एक कारण निवडावे लागणार आहे. जसे तुम्ही टीडीआर फाईल कराल तसे 60 दिवसांनंतर आपल्याला रिफंड मिळेल.