भेटवस्तूंमध्ये मिळणाऱ्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या

भेटवस्तूंमध्ये मिळणाऱ्या सोन्यावर कर कसा भरावा? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर पुढे जाणून घ्या. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून देशात भेटवस्तू देण्याचाही ट्रेंड सुरू आहे. यामध्ये सोन्याचे दागिनेही भेट म्हणून दिले जातात. पण, लग्नादरम्यान भेटवस्तूंमध्ये मिळणाऱ्या सोन्यावर कर कसा भरावा हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या.

भेटवस्तूंमध्ये मिळणाऱ्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या
सोनं
| Edited By: | Updated on: May 29, 2025 | 2:06 PM

लग्नात तुम्हालाही गिफ्ट म्हणून सोनं मिळालं असेल तर टॅक्सशी संबंधित काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. लग्नसमारंभ वगळता अन्य प्रसंगी भेटवस्तू मिळाल्यास त्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यावर कर आकारला जाणार आहे. आता हा नेमका कोणता नियम आहे, याची माहिती पुढे वाचा.

प्राप्तिकर विभागाने 2025 या वर्षाचे विवरणपत्र (ITR) भरण्याची तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, पण सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामात भेट म्हणून मिळणाऱ्या सोन्यावर कर कसा भरावा हे तुम्हाला माहित आहे का? लग्नात तुम्हालाही गिफ्ट म्हणून सोनं मिळालं असेल तर टॅक्सशी संबंधित काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. भारतात लग्नाच्या निमित्ताने मिळणाऱ्या भेटवस्तूंवरील कराचे नियम खूप खास आहेत.

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टनुसार

लग्नादरम्यान मिळणाऱ्या भेटवस्तूंवर (जसे सोने, रोख रक्कम इत्यादी) कोणताही कर लागत नाही. लग्नाच्या भेटवस्तू त्यांच्या मूल्याची पर्वा न करता करमुक्त मानल्या जातात. मात्र, लग्नसमारंभ वगळता अन्य प्रसंगी भेटवस्तू मिळाल्यास त्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यावर कर आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या भेटवस्तूंच्या किमतीला मर्यादा नाही, त्या करमुक्त आहेत.

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टनुसार लग्नात मिळणाऱ्या सोन्यावर कर नसला तरी जेव्हा तुम्ही ते सोनं विकता तेव्हा त्या वेळच्या नफ्यावर (विक्री किंमत-खरेदी किंमत) कर आकारला जाईल. अशा वेळी भेटवस्तूच्या वेळी मिळणारे मूल्य हे बाजारमूल्य मानले जाईल. सोन्याच्या विक्रीवर भांडवली नफा करही शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा दोन प्रकारे आकारला जातो.

36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत (3 वर्ष) सोने विकल्यास सोन्याच्या विक्रीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCJ) कर आकारला जातो. अशा विक्रीतून मिळणारा नफा हा अल्पकालीन भांडवली नफा मानला जातो. हा फायदा तुमच्या सामान्य उत्पन्नात जोडला जाईल आणि तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. म्हणजेच कॅपिटल गेन टॅक्सऐवजी तुम्हाला थेट इन्कम टॅक्स स्लॅबवर पैसे भरावे लागतील. दुसरं म्हणजे 36 महिन्यांनंतर सोनं विकलं तर तो दीर्घकालीन भांडवली नफा ठरेल. अशा नफ्यावर 20 टक्के कर आकारला जाईल. मात्र, यामध्ये तुम्हाला महागाईच्या तुलनेत इंडेक्सेशनचा ही फायदा मिळणार आहे.

लग्नात मिळालेल्या सोन्यावर कर भरावा लागणार नाही, ही वेगळी गोष्ट आहे, पण सोने विकताना त्या वर्षाचे आयकर विवरणपत्र भरताना भांडवली नफ्याचा योग्य तपशील देणे आवश्यक असते. गिफ्टमध्ये मिळालेलं सोनं तुम्ही तुमच्या करमुक्त उत्पन्नात दाखवू शकता, जेणेकरून टॅक्स ऑफिसरला हे स्पष्ट होईल की ते लग्नाचं गिफ्ट आहे.

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टनुसार

लग्नात मिळणाऱ्या सोन्याबाबत अनेक नियम आहेत. नातेवाइकांकडून सोने भेट दिल्यास कर लागू होत नाही. मात्र, जर सोन्याची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य आपल्या स्लॅबनुसार उत्पन्न म्हणून करपात्र असेल.