AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओने या प्लॅनचे दर आधी वाढले, आता 200 रुपयांनी कमी केले, ग्राहकांना मिळणार असे फायदे

Reliance Jio 999 Plan: Jio ने या प्लॅनला 'Hero 5G' प्लॅन नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Airtel चा 979 रुपयांच्या प्लॅन जिओपेक्षा कमी नाही. या प्लॅनमध्ये जिओमधील फायदे मिळतात. तसेच 56 दिवसांसाठी Amazon Prime ची मेंबरश‍िप मोफत मिळते.

जिओने या प्लॅनचे दर आधी वाढले, आता 200 रुपयांनी कमी केले, ग्राहकांना मिळणार असे फायदे
jio
| Updated on: Aug 08, 2024 | 7:05 AM
Share

Reliance Jio 999 Plan: सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या विविध प्लॅनचे दर वाढले. त्यात जिओने आपले सर्वच प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहक नाराज झाले. काही जणांनी स्वस्त प्लॅन असणाऱ्या बीएसएनएलची वाट धरली. परंतु आता जिओ यूजरसाठी चांगली बातमी आहे. जिओने आपल्या एका प्लॅनचे दर कमी केले आहे. आता जिओचा 999 रुपये किंमतीचा प्रीपेड परत आला आहे. 3 जुलै 2024 रोजी या प्‍लॅनची किंमत 1,199 रुपये करण्यात आली होती. आता त्यात 200 कपात करुन 999 रुपये करण्यात आली आहे. तसेच आणखी इतरही फायदे या प्लॅनमध्ये दिले आहेत.

जिओने प्लॅनची व्हॅल‍िड‍िटी वाढवली

जिओने हा प्लॅन रिलॉन्च करताना ग्राहकांना आणखी काही फायदे दिले आहेत. या प्लॅनली मुदत पूर्वी 84 दिवस होती. परंतु आता ती 98 दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता 14 दिवस जास्त व्हॅलिडीटी मिळणार आहे. परंतु पूर्वीपेक्षा डाटा कमी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये पूर्वी 3GB डाटा मिळत होता. तो आता 2GB मिळणार आहे. एकूण या प्लॅनमध्ये 192GB डाटा मिळणार आहे. तो पूर्वी 252GB मिळत होता.

हा फायदा कायम असणार

जिओच्या 999 रुपये प्लॅनचा डाटा कमी झाला तरी इतर फायदे मिळणार आहे. 999 रुपये प्लॅनमध्ये 5G डाटा अनलिमिटेड मिळणार आहे. तुम्ही 5G सर्व्हीस असणाऱ्या भागात राहत असल्यास अनलिमिटेड 5G डाटाचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहक या प्लॅनला पसंती देत आहेत.

100 SMS आणि अनलिमिटेड कॉल

Jio ने या प्लॅनला ‘Hero 5G’ प्लॅन नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Airtel चा 979 रुपयांच्या प्लॅन जिओपेक्षा कमी नाही. या प्लॅनमध्ये जिओमधील फायदे मिळतात. तसेच 56 दिवसांसाठी Amazon Prime ची मेंबरश‍िप मोफत मिळते. त्यामुळे ग्राहकांना हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे.

इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.