AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पाच गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा बँका तुम्हाला कधीच कर्ज देणार नाहीत

Credit Score | तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात.

'या' पाच गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा बँका तुम्हाला कधीच कर्ज देणार नाहीत
डेबिट कार्ड
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 27, 2021 | 8:29 AM
Share

मुंबई: आर्थिक व्यवहार करताना अनेकदा बेफिकरी बाळगल्यामुळे भविष्यकाळात तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. आताच्या घडीला एखादी लहान वाटणारी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकते. त्यामुळे बँक, क्रेडिट कार्ड किंवा कर्जासंबंधी कोणतेही व्यवहार करताना ग्राहकांना पुरेशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हाईमार्क यासारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवत असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. हा स्कोअर जितका जास्त तितके जास्त कर्ज तुम्हाला मिळते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

1. कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता याचा माग ठेवला जातो. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केली तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.

2. तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.

3. तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.

4. क्रेडिट कार्डाची लिमीट वाढवणे हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो. समजा एक लाख रुपयांची लिमीट असलेल्या क्रेडिट कार्डावर आऊटस्टँडिंग ड्युज 25000 असेल. मात्र तुम्ही क्रेडिट लिमिट घटवून 60 हजार केली तर युटिलायझेशन रेट 25 टक्क्यांवरून वाढून 42 टक्क्यांवर पोहोचेल.

5. तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.

इतर बातम्या:

Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...