AC आणि फ्रीजची खरेदी करताना हा स्टिकर बघाच, त्यावरील रेटिंगचा नेमका अर्थ?

| Updated on: Jul 04, 2021 | 10:56 AM

AC Fridge | त्यामुळे हल्ली एसी किंवा फ्रीजची खरेदी करताना त्यावरील स्टार रेटिंग बघितले जाते. ज्या उपकरणावर जास्त स्टार रेटिंग असतात ते तुलनेत थोडे महाग असते पण त्यामुळे वीजेची जास्त बचत होते.

AC आणि फ्रीजची खरेदी करताना हा स्टिकर बघाच, त्यावरील रेटिंगचा नेमका अर्थ?
एसीसोबत पंखा चालवणे किती योग्य! ही आहे योग्य पद्धत
Follow us on

मुंबई: घरात एखादा फ्रीज किंवा एसी घ्यायचा असल्यास बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. फ्रीज किंवा एसीसाठी (AC) लागणारी जागा, त्याची क्षमता आणि किंमत या गोष्टींवर कुटुंबीयांमध्ये बराच खल होतो. याशिवाय, आणखी एक गोष्ट या खरेदी महत्वाची ठरते ती म्हणजे वीजेचा वापर. एखादे उपकरण चालवण्यासाठी किती वीज लागते, हा मुद्दा नेहमीच महत्वाचा असतो. (Know how to check ac refrigerator tv star rating for electricity check authenticity of this rating)

त्यामुळे हल्ली एसी किंवा फ्रीजची खरेदी करताना त्यावरील स्टार रेटिंग बघितले जाते. ज्या उपकरणावर जास्त स्टार रेटिंग असतात ते तुलनेत थोडे महाग असते पण त्यामुळे वीजेची जास्त बचत होते. फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या उपकरणासाठी अत्यंत कमी वीजेचा वापर होतो. मात्र, अलीकडच्या काळात बनावट स्टिकर लावून या रेटिंगमध्येही फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी एसी किंवा फ्रीज खरेदी करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे.

कोणाकडून देण्यात येते रेटिंग?

या रेटिंग्ज ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीकडून देण्यात येतात. तुम्ही फ्रिज किंवा एसी खरेदी करायला जाल तेव्हा त्यावर रेटिंगचे स्टीकर बघावे. त्यावर संबंधित उपकरण चालवण्यासाठी किती वीज खर्ची पडते, हे नमूद केलेले असते. याशिवाय, स्टिकरवर ते कोणत्या वर्षातील आहे, हेदेखील लिहलेले असते. प्रत्येकवर्षी उपकरणात होणाऱ्या बदलांमुळे वीजेचा खप कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे स्टिकरवरील लेटेस्ट डेट बघूनच उपकरण खरेदी करावे.

स्टिकर असली किंवा नकली कसे ओळखाल?

एसी किंवा फ्रीज खरेदी करायला जाताना तुम्ही BEE हे Application डाऊनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला एसी, फ्रीज, पंखा या उपकरणांसाठीचे रेटिंग दिसेल. ही माहिती स्टिकरवरील रेटिंगशी मिळतीजुळती असेल तर ते खरे आहे, असे समजावे. माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित उपकरण BEE नोंदणीकृत नाही, असे समजावे.

संबंधित बातम्या:

Airtel Black | एअरलेटची ग्राहकांसाठी खास सुविधा, मोबाईल, DTH, Fibre सारख्या सर्व सेवांसाठी एकच बिल

(Know how to check ac refrigerator tv star rating for electricity check authenticity of this rating)