
रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर तिकीट बुक करताना सर्वात मोठा प्रश्न असतो की तिकीट कन्फर्म होणार का? अनेकदा मित्रमंडळी किंवा कुटुंब एकत्र ट्रिपला निघतात आणि सगळ्यांचे तिकीट एका PNR वर बुक केले जातात. पण चार्ट तयार झाल्यावर लक्षात येतं, काही जणांचं तिकीट कन्फर्म झालंय, तर काहींचं अजूनही वेटिंगवरच आहे. अशा वेळी डोक्यात अनेक प्रश्न सुरू येतात जसे कि, वेटिंगवाल्यांना जागा मिळेल का? प्रवास करता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं पैसे परत मिळतील का? या सर्व
जर सगळ्यांचं तिकीट वेटिंग असेल तर काय?
जर तुमच्या PNR वर असलेले सर्व प्रवासी वेटिंग लिस्टमध्ये राहिले आणि चार्ट तयार झाल्यावरही त्यांचा क्रमांक पुढे सरकला नाही, तर तिकीट आपोआप रद्द होतं. अशावेळी फक्त थोडे कॅन्सलेशन चार्जेस कपात होतात आणि उरलेले पैसे बँक खात्यात परत येतात.
अर्ध्यांचे वेटिंग राहिले तर ?
जर एका PNR वर काही जणांचे तिकीट कन्फर्म झाले, आणि काहींचे वेटिंगवर राहिले, तर ते तिकीट आपोआप रद्द होत नाही. आणि प्रवासात जर वेटिंग लिस्टवाल्यांना जागा मिळाली नाही, तरीही त्यांचा रिफंड मिळत नाही.
वेटिंग असलं तरी प्रवास करता येतो का?
हो, जर तुमच्या ग्रुपमधील काही जणांचे तिकीट कन्फर्म असेल आणि काहींचे वेटिंगवर, तर वेटिंग लिस्टवर असलेले प्रवासी TTE च्या परवानगीने एकत्र प्रवास करू शकतात. मात्र, सीट मिळेलच याची खात्री नसते.
रिफंड हवा असेल तर ‘हा’ उपाय करा
जर तिकीट पार्शली कन्फर्म असेल आणि तुम्हाला प्रवास रद्द करायचा असेल, तर चार्ट तयार होण्याआधीच तिकीट रद्द करा. चार्जेस कपात होऊन उरलेली रक्कम परत मिळेल. एकदा चार्ट तयार झाल्यावर, रिफंडचा कोणताही पर्याय उरत नाही.
RAC तिकिटाचं काय?
RAC असलेले तिकीट चार्ट तयार होण्यापूर्वी रद्द केल्यास रिफंड मिळतो. चार्ट झाल्यावर मात्र कन्फर्मप्रमाणे नियम लागू होतो.