Gold Silver Rate Today : मुंबईसह पुण्यात सोने गडगडले, वाचा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर

| Updated on: Jan 11, 2022 | 8:36 PM

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 47,548 भावाने ट्रेडिंग सुरू होते. चांदीच्या भावाने प्रति किलो 59, 217 रुपयांचा टप्पा गाठला आहे. बाजारपेठेवर ओमिक्रॉनचे सावट असले तरीही लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या भावात तेजी-घसरणीचे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today : मुंबईसह पुण्यात सोने गडगडले, वाचा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोने
Follow us on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या भावावर (Gold Silver Rate)  दिसून आला आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 54 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,448 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचे भाव 178 रुपयांनी गडगडले. राजधानी दिल्लीत चांदीला प्रति किलो 59,217 रुपयांचा भाव मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात घसरण दिसून आली.

मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 47,548 भावाने ट्रेडिंग सुरू होते. चांदीच्या भावाने प्रति किलो 59, 217 रुपयांचा टप्पा गाठला आहे. बाजारपेठेवर ओमिक्रॉनचे सावट असले तरीही लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या भावात तेजी-घसरणीचे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत सोन्यात घसरण

आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात घसरण नोंदविली गेली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारचा भाव 20 रुपयांनी घसरला.  मागील सहा दिवसांतील मुंबईतील सोन्याचे भाव

• 11 जानेवारी :48,590/प्रति तोळे
• 10 जानेवारी :48,610/प्रति तोळे
• 09 जानेवारी :48,610 /प्रति तोळे
• 08 जानेवारी :48,600/प्रति तोळे
• 07 जानेवारी :48,510 /प्रति तोळे

पुण्यात किचिंत घरसण

पुण्यात सोन्याच्या भावात दहा रुपयांची घसरण नोंदविली गेली. सोन्याचे भाव 48,340 प्रति तोळ्यावर पोहोचले. मागील सहा दिवसांतील पुण्यातील सोन्याचे भाव दृष्टीक्षेपात:

• जानेवारी 11 :48,340 /प्रति तोळे
• जानेवारी 10 :48,350/प्रति तोळे
• जानेवारी 9 :48,350/ प्रति तोळे
• जानेवारी 8 :48,340/प्रति तोळे
• जानेवारी 7 :48,650/प्रति तोळे
• जानेवारी 6 :48,660/प्रति तोळे

उप-राजधानी नागपूरमध्ये सोन्याचे 20 रुपयांच्या घसरणीसह भाव 48590 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
नाशिकमध्ये 10 रुपयांच्या घसरणीसह सोन्याचे भाव 48,340 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

ओमिक्रॉनचं सावट, 55 हजारांचा टप्पा!

ओमिक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव, फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ, डॉलरचा सावरलेला भाव, कच्चा इंधनाच्या भावांतील चढ-उतारांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर जाणविण्याची शक्यता असल्याचे कमोडिटी मार्केटच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,000 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व शुल्कांमध्ये वाढ, नवे दर दहा फेब्रुवारीपासून लागू

EPFO खातेधारकांसाठी खूशखबर! इमर्जन्सीमध्ये काढा 1 लाख/- दिवसाची प्रक्रिया 60 मिनिटांत