Atmanirbhar Bharat : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत नाव नोंदवण्यास मुदतवाढ, काय आहेत योजनेचे फायदे?

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या (Ministry of Labour and Employment) आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा (ABRY) आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांनी फायदा घेतला आहे. आतापर्यंत 22 हजार 810 कोटी रुपयांचे वितरणही करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात नव्या रोजगार संधींना प्रोत्साहन देण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Atmanirbhar Bharat : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत नाव नोंदवण्यास मुदतवाढ, काय आहेत योजनेचे फायदे?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 7:02 PM

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana) अंतर्गत नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीची सुधारित अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत असणार आहे. ईपीएफओने (Employee Provident Fund Organisation) यापूर्वीच मुदतवाढीचा निर्णय घेतला होता. ट्विटद्वारे याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने कोविड प्रकोपाच्या काळात आत्मनिर्भर भारत रोजगार योजना हाती घेतली होती. आतापर्यंत योजनेअंतर्गत तब्बल 40 लाख (39.59 लाख) व्यक्तींना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.

ABRY काय आहे?

कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees’ Provident Fund Organization – EPFO) सह नोंदणीकृत आस्थापनांत नवीन कर्मचाऱ्यांना सहभागी करण्याच्या हेतूने अनुदान प्रदान केले जाते.

  1. 1000 कर्मचाऱ्यांपर्यंतच्या आस्थापनांत दोन वर्षांसाठी कर्मचाऱ्यांचे (12%) आणि आस्थापना (12%) योगदान असेल. एकूण वेतनाच्या 24% प्राप्त होईल.
  2. 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांना (Employers) दोन वर्षांसाठी कर्मचाऱ्यांच्या हिस्याचे 12% प्राप्त होईल.
  3. आत्मनिर्भर योजनेनुसार, अनुदानाची रक्कम केवळ नवीन कर्मचाऱ्यांच्या आधार संलग्नित EPFO खात्यात (UAN) जमा केली जाईल.

‘आत्मनिर्भर’ कामगार:

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या (Ministry of Labour and Employment) आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा (ABRY) आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांनी फायदा घेतला आहे. आतापर्यंत 22 हजार 810 कोटी रुपयांचे वितरणही करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात नव्या रोजगार संधींना प्रोत्साहन देण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे (Know all about Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana ABRY and benefits)

जाणून घ्या- योजनेचे लाभार्थी व निकष:

आत्मनिर्भर योजनेंतर्गत EPFO मध्ये नोंदणीकृत संस्थांमध्ये नियुक्ती होणाऱ्या आणि 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेतो येतो. याशिवाय 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असणारे, 1 ऑक्टोबर 2020 च्या आधी ईपीएफओशी संबंधित संस्थेत नोकरी न करणारे आणि UAN किंवा ईपीएफ सदस्यता खातं नसणारे कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

यूएएन खातं असणारे आणि 15,000 रुपयांपेक्षा कमी वतेन असणारे, परंतू 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान कोविड-19 संसर्गाच्या काळात नोकरी गमावलेले आणि त्यानंतर ईपीएफओशी संबंधित कोणत्याही संस्थेत नोकरी न करणारे ईपीएफओ सब्सक्राइबर्स देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

इतर बातम्या –

सेन्सेक्सला ‘तेजी’चा डोस: 651 अंकांची वाढ, गुंतवणूकदार 2.33 लाख कोटींनी मालामाल!

मतदार ओळखपत्राशिवाय मतदानाचा हक्क बजावू शकता! या 11 कागदपत्रांपैकी एकाची आवश्यकता 

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.