LIC : योजनाच जोरदार! असे मिळवा 22 लाख

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 10:05 PM

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल फायदा

LIC : योजनाच जोरदार! असे मिळवा 22 लाख
परतावा जोरदार

नवी दिल्ली : आजच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, भारतीय जीवन विमा महामंडळावर (LIC) अनेक लोकांचा अद्यापही भरोसा कायम आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एलआयसी वेळोवेळी अनेक आकर्षक योजना घेऊन येते. आता आपण एलआयसीच्या कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणाऱ्या योजनेची माहिती घेऊयात. एलआयसीची धन संचय पॉलिसी (LIC Dhan Sanchay Scheme) ही अशीच एक योजना आहे. यामध्ये हमखास परतावा मिळतो. सोबतच इतर फायदेही मिळतात. एलआयसीच्या योजनेत गुंतवणुकीसोबतच विम्याचेही संरक्षण मिळते.

LIC धन संचय प्लॅन एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, स्वतंत्र बचत विमा योजना आहे. या योजनेत बचतीसोबतच जीवन विम्याचा लाभही मिळतो. या पॉलिसीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. तर योजनेतील निश्चित फायदे आणि अनुषांगिक लाभ ही हमखास देण्यात येतात.

एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे चार पर्याय मिळतात. प्लॅन ए आणि बी अंतर्गत 3,30,000 रुपयांचा सम अॅश्युर्ड, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयाची किमान सम अॅश्युर्डचे संरक्षण, प्लॅन डी अंतर्गत 22,00,000 रुपयांचा सम अॅश्युर्ड संरक्षण मिळते.

हे सुद्धा वाचा

या योजनेत वयाची अट आहे. योजनेत 3 वर्षांच्या किमान वयाची अट आहे. वयाची कमाल अट प्लॅनमध्ये वेगवेगळी आहे. प्लॅन ए आणि बीची कमाल वयाची अट 50 वर्ष, प्लॅन सी अंतर्गत 65 वर्षे आणि डी साठी 40 वर्षाची कमाल मर्यादा आहे.

ही पॉलिसी तुम्ही 5, 10 आणि 15 वर्षांसाठी खरेदी करु शकता. जितक्या वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक कराल, त्यानंतर तितक्या वर्षासाठी उत्पन्न मिळेल. म्हणजे 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर पुढील 5 वर्षांसाठी नियमीत कमाई होईल.

या योजनेत कमीतकमी 30000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला कर्ज ही मिळते. या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पॉलिसी खरेदी करता येते.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI