LIC Housing Finance ची मोठी घोषणा, गृह कर्जावरील व्याज दर केला कमी, मर्यादित कालावधीपर्यंत मिळेल फायदा

| Updated on: Jul 02, 2021 | 8:41 PM

ही योजना 31 ऑगस्टपर्यंत लागू असेल आणि कर्जाचा पहिला हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी भरण्यात यावा. एलआयसी हाउसिंग फायनान्स होम लोनवरील नवीन व्याजदर खाली 6.66 टक्क्यांवर आला आहे. (LIC Housing Finance's big announcement, lowering interest rates on home loans)

LIC Housing Finance ची मोठी घोषणा, गृह कर्जावरील व्याज दर केला कमी, मर्यादित कालावधीपर्यंत मिळेल फायदा
तुमचा रिपेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला केवळ एक फॉर्म भरून केवायसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. त्यानंतर तुमचे लोन ट्रान्सफर होईल.
Follow us on

नवी दिल्ली : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने(LIC Housing Finance) गृह कर्जावरील व्याज दर कमी केला आहे. यामुळे 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर कायमचे कमी झाले आहेत. तथापि, ही योजना 31 ऑगस्टपर्यंत लागू असेल आणि कर्जाचा पहिला हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी भरण्यात यावा. एलआयसी हाउसिंग फायनान्स होम लोनवरील नवीन व्याजदर खाली 6.66 टक्क्यांवर आला आहे. (LIC Housing Finance’s big announcement, lowering interest rates on home loans)

एसबीआयचा गृहकर्जावर सर्वात कमी व्याज दर

सध्या एसबीआयचा गृहकर्जावरील सर्वात कमी व्याज दर आहे. एसबीआयचा किमान व्याज दर 6.65 टक्के आहे. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की नवीन दर नवीन वेतन धारकांना लागू केली जाईल. गृहकर्ज विभागात कंपनीने दिलेला हा सर्वात कमी दर आहे. सुधारीत दर कर्ज घेणार्‍याच्या पत क्षमतेवर अवलंबून असतील, असे निवेदनात म्हटले आहे. यासाठी त्यांचा सीआयबीआयएल स्कोअर(CIBIL Score) आधार असेल.

सेंटिमेंट सुधारण्यासाठी उचलले हे पाऊल

एलआयसी हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वाई विश्वनाथ गौर म्हणाले की, कोरोना महामारीचा सर्व देशभर होणारा परिणाम लक्षात घेता आम्ही असा दर सादर करु इच्छित होतो, ज्यामुळे लोक स्वप्नातील घर घेण्यासाठी सक्षम होऊ शकतील. आम्हाला आशा आहे की या दर कपातीमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि या क्षेत्राच्या पुनरुत्थानास मदत होईल.

LIC HomY App वर ही सुविधा उपलब्ध

निवेदनात असे म्हटले आहे की, 6.66 टक्क्यांसह housing finance company ने जास्तीत जास्त 30 वर्षांच्या गृह कर्जावरील सर्वात कमी दर देण्याची ऑफर दिली आहे. लोक कंपनीच्या एलआयसी होमवाय अॅप(LIC HomY App)द्वारे गृहकर्जासाठी अर्ज करु शकतात आणि ऑनलाईन मान्यता घेऊ शकतात. ग्राहक एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या कार्यालयात न जाता त्यांच्या कर्जाच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (LIC Housing Finance’s big announcement, lowering interest rates on home loans)

इतर बातम्या

Devendra Fadnavis | जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी चौकशी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने : फडणवीस

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर : वर्षा गायकवाड