विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर : वर्षा गायकवाड

परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया जाहीर केलीय, असं मत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर : वर्षा गायकवाड
कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 02, 2021 | 8:09 PM

मुंबई : “विद्यार्थी हित लक्षात घेऊन बारावी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षिता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मुल्यमापन प्रक्रिया जाहीर केलीय,” असं मत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय. देशपातळीवर एकसूत्रता समानता यावी यासाठी एकच मुल्यमापन प्रक्रिया असावी अशी आग्रही मागणी राज्यसरकारने केली होती. यानुसार सर्वसमावेशक विश्वसनीय सातत्यपूर्ण मुल्यमापन धोरण लक्षात घेऊन बारावी परीक्षेचे नवीन मुल्यमापन धोरण जाहीर करण्यात आलं आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad on HSC result by valuation method).

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मुल्यमापन करत असताना शालेय, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर एक परीक्षा समितीची स्थापना करून मूल्यमापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी शाळेने सर्व प्रकारचे अभिलेख, माहिती जतन करून ठेवावी. निकालपत्र तयार करत असताना कोणत्याही प्रकारची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी.”

“शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी 29 जून 2021 रोजी शासनाला सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता 10 वीची परीक्षा विविध परीक्षा मंडळांमार्फत (बोर्ड) आयोजित करण्यात आल्या. तसेच वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता 11 वीचे वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वीचे उपरोक्त मूल्यमापन हे कोविड-19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीपूर्वी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वरील मुल्यमापनाचे अभिलेख संबधित परीक्षा मंडळांकडे तसेच कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर उपलब्ध आहेत,” असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

निकाल कसा जाहीर करणार?

शासन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मधील मूल्यमापन तसेच इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी मध्ये वर्षभरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) सन 2021 चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेत आहे. ही अपवादात्मक परिस्थितीतील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता 12 वी) निकाल तयार करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.

12 वी निकालाची कार्यपद्धती

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्वच उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 12 वीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही. त्यामुळे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. हे करताना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 मधील विषयनिहाय लेखी व तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत. त्यातील तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन यासाठी मंडळाच्या सूचनांप्रमाणे आयोजित परीक्षांमध्ये विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम मूल्यमापनात घेण्यात येणार आहेत.

गुण विभागणी तोंडी/प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भुत आहे.

निकालातील गुणांची विभागणी कशी?

विद्यार्थ्याची इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक , इयत्ता 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व इयत्ता 12 वी चे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील. उपरोक्तप्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी 30 टक्के गुण इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक, 30 टक्के गुण इ. 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व 40 टक्के गुण इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन यानुसार भारांश विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता 10 वी साठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील.

इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.

उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयाने विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार वर्षभर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेले गुण तसेच सदर गुण किती पैकी आहेत सदर विषयासाठी एकूण किती गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले आहे

तोंडी परीक्षा, मुल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचं काय?

विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीत सदर गुणांचे संगणक प्रणालीमधून रूपांतर करून सदर गुण विद्यार्थ्यास संगणक प्रणालीद्वारे प्रदान केले जातील.
मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 12 वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे. ज्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन पूर्ण केलेले आहे.

हेही वाचा :

CBSE 10th Result 2021: सीबीएसईचा निकाल अंतिम टप्प्यात, काहीच दिवसांपूर्वी निकाल जाहीर होणार

भारतात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा, शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतूनच उघड

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad on HSC result by valuation method

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें