LIC IPO : अखेर एलआयसी आयपीओ जाहीर; जाणून घ्या एलआयसी आयपीओबाबत सर्व काही एका क्लीकवर

एलआयसीच्या बहुप्रतिक्षित आयपीओची (IPO) अखेर घोषणा करण्यात आली आहे. आयपीओबाबत एलआयसी मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली होती. या बैठकीत आयपीओबाबत घेण्यात आलेला निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.

LIC IPO : अखेर एलआयसी आयपीओ जाहीर; जाणून घ्या एलआयसी आयपीओबाबत सर्व काही एका क्लीकवर
Image Credit source: LIC India
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 3:39 PM

मुंबई : एलआयसीच्या बहुप्रतिक्षित आयपीओची (IPO) अखेर घोषणा करण्यात आली आहे. आयपीओबाबत एलआयसी मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली होती. या बैठकीत आयपीओबाबत घेण्यात आलेला निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गुंतवणुकदारांना (Investors) 902 ते 949 रुपये या दरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओत एका खंडात 15 शेअर असणार आहेत. याचाच अर्थ तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर 15 शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. याला (LIC) 3.0 फेज असं नाव देण्यात आलं आहे. एलआयसीच्या आयपीओला चार मे 2022 पासून सुरुवात होणार आहे. तर 9 मे 2022 ही क्लोजिंग डेट असणार आहे. एलआयसी मंडळाने या आयपीओसाठी कर्मचा-यांना 45 रुपये तर विमाधारकांना 60 रुपये सवलत जाहीर केली आहे. म्हणजे तुम्ही जर एलआयसीचे विमाधारक असला किंवा कर्मचारी असाल तर तुम्हाला या शेअर खरेदीमध्ये 45 ते 60 रुपयांची सुट मिळू शकते. एलआयसीचा हा आयपीओ नेमका कसा असणार समजून घेऊयात महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे

  1. या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकार एलआयसीमधून आपला 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे, म्हणजेच एलआयसी 22. 13 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. या आयपीओची प्राईस बँड 902 ते 949 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.
  2. या आयपीओच्या एका खंडात 15 शेअर्स असणार आहे, म्हणजेच जर तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये गुतंवणूक करायची असल्यास कमीत कमी 15 शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.
  3. आयपीओला चार मे 2022 पासून सुरुवात होणार आहे. तर 9 मे 2022 ही आयपीओची क्लोजिंग तारीख असणार आहे.
  4. तुम्ही जर एलआयसीचे कर्मचारी किंवा विमाधारक असाल तर तुम्हाला प्रति शेअरमागे 45 ते 60 रुपयांची सूट मिळू शकते
  5. 22. 13 कोटी शेअर्सपैकी काही शेअर्स हे पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवून, उरलेले शेअर्स हे पात्र संस्था, रिटेल गुंतवणूकदार आणि बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  6. यापैकी 50 टक्के शेअर्स हे पात्र संस्थासाठी असतील, 35 टक्के शेअर्स हे रिटेल गुंतवणूकदार तर 15 टक्के शेअर्स हे बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदांना उपलब्ध करून देण्यात येतील.
  7. तुम्हाला जर शेअर्सचा लॉट खरेदी करायचा असेल तर कमीत कमी 14,235 रुपयांची गुंतवणूक करवी लागेल, मात्र एलआयसी कर्मचाऱ्याला 45 रुपयांची सूट मिळाल्याने त्याला हा 15 शेअर्सचा लॉट खरेदी करण्यासाठी 13,560 रुपयेच द्यावे लागणार आहेत.
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.