LIC IPO UPDATE: लागा तयारीला, एलआयसी आयपीओचा मार्ग मोकळा; अंतिम ड्राफ्ट आजच ‘सेबी’कडं?

| Updated on: Feb 10, 2022 | 5:51 PM

भारतीय आयुर्विमा महामंडळानं (एलआईसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) विवरण पुस्तिकेची निर्मिती केली आहे. याद्वारे सेबीला गुंतवणूक धोरण सादर केले जाणार आहे.

LIC IPO UPDATE: लागा तयारीला, एलआयसी आयपीओचा मार्ग मोकळा; अंतिम ड्राफ्ट आजच ‘सेबी’कडं?
LIC (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

नवी दिल्ली- भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या आयपीओची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. एलआयसीकडून आज (गुरुवारी) ड्राफ्ट रेडी हिअरिंग प्रॉस्पेक्ट (DRHP) सेबीला सादर केले जाण्याची शक्यता आहे. एलआयसीचा आयपीओ कधी दाखल होणार याकडं अर्थजगताचं लक्ष लागलं होतं. भारतीय आयुर्विमा महामंडळानं (एलआईसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) विवरण पुस्तिकेची निर्मिती केली आहे. याद्वारे सेबीला गुंतवणूक धोरण सादर केले जाणार आहे. अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकारी तुहिन कांत यांनी मार्च अखेरपर्यंत एलआयसी आयपीओ सूचीबद्ध (लिस्टेड) करण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले होते. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात 1.75 लाख कोटी रुपये निर्गृंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 32,835 कोटी रुपये निर्गृंतवणुकीतून उभारण्यात आले होते.

पॉलिसीधारकांना सवलत:

एलआयसीच्या बहुप्रतीक्षित आयपीओत पॉलिसीधारकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. ईटी नाऊच्या वृत्तानुसार, आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 5 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तसेच रिटेल बोलीधारकांना आणि कर्मचाऱ्यांना प्राईस बँडवर (PRICE BAND) काही सवलत मिळण्याची अपेक्षा आहे.
केंद्राचं आयपीओसाठी प्रयत्न

केंद्र सरकारने सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओसाठी मोठी पावलं उचलली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत 10 मर्चंट बँकरची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये गोल्डमॅन सॅक्स, सिटी ग्रूप आणि नोमुरा यांचा समावेश आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास यांची नियुक्ती केली होती. एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. एलआयसीच्या आयपीओ कधी येऊन धडकणार याची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे.

आयपीओला विक्रमी बोली

इश्य प्राईसवर एलआयसी मार्केट कॅपमध्ये देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये सहज समाविष्ट होऊ शकेल. लिस्टिंगनंतर एलआयसीची कामगिरी दमदार राहिली तर विमा कंपनीची दादागिरी आयपीओ आणि शेअर बाजारात ही चालेल. कंपनी आयआयएल आणि टीसीएलही मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा मार्ग आहे. कंपनीला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा शेअर बाजारपेठेत लिस्ट केले जातात. आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम कंपनी स्वतःच्या निर्णयानुसार खर्च करतात. या रकमेचा वापर कंपनी लोन भरण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकते. स्टॉक एक्स्चेंज वर शेअर्स लिस्टिंगमुळे कंपनीला आपल्या शेअरला योग्य किंमत मिळविण्यासाठी मदत होते.